ED : घोडा, मांजरी, दागिनेच नव्हे तर सुकेनने जॅकलिनसाठी खरेदी केले होते घर..

Jacqueline Fernandez : सुकेश याने तिच्यासाठी श्रीलंकेत घरही खरेदी केले होते, अशी माहिती समोर आली आहे.
Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) हिला काल (बुधवारी) समन्स बजावले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला २६ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या पतियाळा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. (Jacqueline Fernandez latest news)

ईडीनं दाखल केलेल्याआरोपपत्रानंतर तिला समन्स बजावला आहे, आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव असल्याने न्यायालयाने समन्समध्ये म्हटलं आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्यासमवेत कसे संबंध होते आणि २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गैरव्यवहारात आपली भूमिका होती हे जॅकलीन हिला न्यायालयाला सांगावे लागणार आहे.

याप्रकरणी नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राचीही (Supplementary ChargeSheet) न्यायालयाने दखल घेतली आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिनला घोडा, मांजरी आणि दागिनेच भेट दिल्याचे आपल्याला माहिती आहे, पण सुकेश याने तिच्यासाठी श्रीलंकेत घरही खरेदी केले होते, अशी माहिती समोर आली आहे. सुकेशविरोधात खटला सुरू आहे.

Jacqueline Fernandez
Cabinet Expansion : दुसऱ्या टप्यात सात कॅबिनेट तर १७ राज्यमंत्र्यांचा विस्तार, मुनगंटीवार म्हणाले...

"जॅकलिनने कबूल केले आहे की सुकेशने तिला श्रीलंकेत घर खरेदी केल्याबद्दल सांगितले होते. मात्र अद्याप ती त्या घरात कधी गेली नाही. ही मालमत्ता श्रीलंकेतील वेलिगामा येथे असल्याचे सांगितले जाते. हे श्रीलंकेचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे," असे ईडीच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

जॅकलिनचे आई-वडील बहरीनमध्ये राहतात. बहारीन आणि मुंबईतही प्रत्येकी एक घर घेण्यासाठी सुकेशने अ‍ॅडव्हान्स रक्कमदेखील दिली होती. सुकेश हा फसवणूक करणारा होता हे जॅकलिनला आधीच माहित होते, असे ईडीने आरोपपत्रात म्हटलं आहे.

पटियाला कोर्टात 17 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलिनवर सुकेशकडून 5.71 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. सुकेशच्या कामाची माहिती असतानाही जॅकलिन सुकेशकडून भेटवस्तू घेण्याच्या प्रकरणात स्वत:ला पीडित म्हणून दाखवत आहे, असेही ईडीने म्हटले आहे. याप्रकरणी ईडीने जॅकलिनलाही सहआरोपी केले आहे. 12 सप्टेंबरला दिल्ली पोलीसदेखील अभिनेत्रीची चौकशीही करणार आहेत.

सुकेशनं 5 प्राणी जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलंय. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलिनला सुकेशनं महागडी ज्वेलरी देखील गिफ्ट म्हणून दिली आहे. या कलेक्शनमध्ये 15 लाखांच्या इअरिंग्सचा (कानातले) समावेश आहे. तसेच दोन डायमंड इअरिंग्स, कार्टियर बांगड्या आणि टिफनी ब्रेसलेट देखील जॅकलिनला सुकेशनं दिले. सुकेशवर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com