Sunil Tatkare On NCP Crisis : 'अटी-शर्थींसह 'घड्याळ' वापरणार का?' कोर्टाच्या निर्णयावर तटकरे म्हणाले....

Sunil Tatkare On Jitendra Awhad : "शरद पवारांबद्दल चुकीचे बोलले होते. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांचा पराभव करण्याचा विडा उचलला..."
Sunil Tatkare On NCP Crisis : 'अटी-शर्थींसह 'घड्याळ' वापरणार का?' कोर्टाच्या निर्णयावर तटकरे म्हणाले....
Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष नाव आणि चिन्हाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात वाद सुरू आहे. या प्रकरणी मंगळवारी (ता. 19) झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शरद पवारांना दिलासा दिला, तर अजित पवार गटाची धाकधूक वाढवली आहे. पक्ष चिन्ह घड्याळ हे चिन्ह कुणाचे? प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने चिन्हाचा वापर अटी - शर्थींसह करण्यात यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. (Latest Marathi News)

Sunil Tatkare On NCP Crisis : 'अटी-शर्थींसह 'घड्याळ' वापरणार का?' कोर्टाच्या निर्णयावर तटकरे म्हणाले....
Pune NCP Ajit Pawar : लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाची नाराजी दूर; शिंदे सरकारनं उचललं मोठं पाऊल

जितेंद्र आव्हाड हे बाष्कळपणाने बोलतात. घड्याळ चिन्ह आणि पक्ष हे आमचंच आहे. आव्हाड यांचे पिटीशन आम्हाला घड्याळ मिळू नये यासाठी होते. घड्याळ चिन्ह रद्द करावे, यासाठी त्यांचा अट्टहास होता. पण न्यायालयाने त्यांना जोरदार चपराक दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला चिन्हाबाबत जाहिरात देण्यास सांगितले आहे. कारण पलीकडच्या गटाने आमचा पराभव होऊ शकतो, असा युक्तिवाद केला. आम्हाला मिळालेले चिन्ह थांबावे, असे त्यांना वाटते, आम्ही जाहिरात देणार आहोत. घड्याळ हे चिन्ह वापरून निवडणुकांना सामोरे जाणार आहोत, असे तटकरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवतारेंवर टीका -

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कणा आहेत. सासवड ही जागा काँग्रेसची (Congress) होती. तेथे आघाडीची जागा काँग्रेसकडे होती. त्यावेळी शिवतारे हे आमचे नेते शरद पवारांबद्दल चुकीचे बोलले होते. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांचा पराभव करण्याचा विडा उचलला होता. असा हा विषय आहे. शिवतारे यांच्याकडे कुणाची स्क्रिप्ट आहे, याचा शोध घेत आहे. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. त्यामुळे शिवतारेंना महत्त्व द्यावे असे वाटत नाही, असे तटकरे म्हणाले.

Sunil Tatkare On NCP Crisis : 'अटी-शर्थींसह 'घड्याळ' वापरणार का?' कोर्टाच्या निर्णयावर तटकरे म्हणाले....
Subhash Bhamre News: उमेदवार बदला; BJP कार्यकर्त्यांचा पक्षश्रेष्ठींना ई-मेल; डॉ. सुभाष भामरे अस्वस्थ

अजित पवारांची धाकधूक वाढली -

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाला प्रचार सभेत ज्येष्ठ नेते शरद पवारांचा फोटो वापरू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाने अजित पवार गटाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. अजित पवार गटाने यापुढे घड्याळ चिन्ह वापरताना प्रत्येक वेळी आणि प्रत्येक ठिकाणी, 'घड्याळ चिन्हाबाबतचे निकालाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे', असे 'ठळक' अक्षरात उल्लेख करावा लागणार आहे. न्यायालयाच्या निकालाचे शरद पवार गटाकडून स्वागत करण्यात आले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com