Delhi : खासदार प्रफुल्ल पटेल यांचा गेल्या ४० वर्षांतील राष्ट्रीय पातळीवरचा अनुभव आणि २००७ पासून दिल्लीत संसदेतील कामाचा अनुभव खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. त्यामुळे या दोघांवर राष्ट्रीय पातळीवर पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी कार्यकारी अध्यक्षाच्या माध्यमातून देण्यात आली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी सांगितले. (Sunil Tatkare told reason for appointing Supriya Sule, Prafull Patel as NCP's working president....)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (prafull Patel) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमाशी बोलताना तटकरे यांनी पटेल आणि सुळे यांच्या निवडीमागची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत आहेत, यापुढेही करत राहतील. त्यामुळे वेगळ्या पद्धतीचा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. याउलट २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शरद पवार हे विरोधी पक्षाचे ऐक्य करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यावेळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी होणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळेच प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दोन कार्यकारी अध्यक्ष नेमून राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत उत्तम पद्धतीने संतुलन साधले आहे. महाराष्ट्रातील संघटन हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मजबूत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे गेल्या २४ वर्षांपासून मेहनत घेत आहेत. काम करण्याची विलक्षण हातोटी असलेल्या अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून पाहिलं जाते. अजित पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय राज्यात पक्षाची संघटना आहेच. सामुदायिकरित्या आम्ही सर्वजण काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे खासदार तटकरे यांनी नमूद केले.
सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन मुंबईतील कार्यालयात होतो आहे. त्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवारही पुण्यात आज ध्वजवंदन करणार होते. पण, दिल्लीत महत्वाची बैठक असल्यामुळे अजित पवार हे आज आले. नियोजित कार्यक्रमामुळे सुप्रिया सुळे मुंबईत थांबल्या आहेत. त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.