राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार ;सुप्रीम कोर्टाचा दणका,याचिका फेटाळली

Narayan Rane : सुप्रीम कोर्टाचा निर्णय नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Narayan Rane Bungalow
Narayan Rane Bungalow sarkarnama

मुंबई : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचा जुहू येथील अधीश बंगला पाडण्याबाबत मुंबई हायकोर्टाने (Mumbai High court) मोठा निर्णय दिला होता. या निर्णयाच्या विरोधात नारायण राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सोमवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे राणे यांना अनाधिकृत बांधकाम पाडावे लागणार आहे. त्यांना दहा लाखांचा दंड देखील भरावा लागणार आहे, नारायण राणेंना येत्या दोन आठवड्यात स्वत: हून हे अनधिकृत बांधकाम पाडावे लागणार आहे, अन्यथा त्यानंतर मुंबई महापालिकेस कारवाईची मुभा असणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Narayan Rane Bungalow
Girish Mahajan : शिवसेना भवनासाठी मारामाऱ्या होतील ; भाजपचा शिवसेनेला टोला

नारायण राणे यांच्या जुहु येथील अधीश बंगल्यावर (Narayan Rane Juhu adhish bungalow) बुलडोझर चालवण्याचे आदेश हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. यासोबतच नारायण राणे यांना 10 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. अधीश बंगल्याचे बांधकाम अनियमित असल्याने महापालिकेने नारायण राणे यांना आधी नोटिस बजावली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

मुंबईतील जुहूमधील नारायण राणे यांचा अधीश बंगला अनेक महिन्यापासून मुंबई महापालिकेच्या रडारवर आहे. बंगल्याचं बांधकाम अनियमित असल्याचे महापालिकेने म्हटलं होते. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्याची पाहणीदेखील केली होती. त्यानंतर नारायण राणे यांना नोटिस देखील बजावली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाने देखील बंगला पाडण्याच्या कारवाईला ग्रीन सिग्नल दिला आहे.

काय आहे प्रकरण

  • नारायण राणे यांचा अधीश बंगला त्याच्या उंचीवरून वादात सापडला आहे.

  • महापालिकेच्या नियमानुसार बंगल्याची उंची बी 11 मीटर पेक्षा जास्त असू नये. परंतु अधीश बंगल्याची उंची 32 मीटर आहे.

  • अधीश बंगल्यातील बांधकाम नियमित करण्यात यावे, अशी मागणी याचिका नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती.

  • ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.

  • हायकोर्टाने महापालिकेला बंगला पाडण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com