Sule Vs Fadnavis : ''पार्टटाईम गृहमंत्रिपद सांभाळण्यापेक्षा सरळ ...'' सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला !

Supriya Sule News : मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच चिघळताना दिसत आहे.
Supriya Sule and Devendra Fadnavis
Supriya Sule and Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule and Devendra Fadnavis News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्यात जी काही परिस्थिती उद्भवली आहे, ज्या काय हिंसक घटना घडत आहेत. यास राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांचे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांचे अपयश असल्याचे म्हटले आहे. शिवाय, त्यांनी गृहमंत्रीपद सोडावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule and Devendra Fadnavis
Supriya Sule News :''आपण एका ताटात जेवलोय...'' अजितदादांना उद्देशून सुप्रियाताईंचं सूचक विधान!

सुप्रिया सुळेंनी म्हटले की, ''राज्य मंत्रिमंडळातील एका सदस्याच्या गाडीची संतप्त जमावाकडून तोडफोड करण्यात आली. गृहमंत्र्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती राखण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यांना ही परिस्थिती हाताळता येत नसेल तर पार्टटाईम गृहमंत्रिपद सांभाळण्यापेक्षा सरळ राजीनामा देऊन सन्मानाने मंत्रिमंडळातून बाहेर पडणे श्रेयस्कर आहे. हि परिस्थिती उद्भवण्यामागे गृहमंत्र्यांचे अपयश आहे.''

काल मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली यावरूनही सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे, ''सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाही का? महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तातडीने राजीनामा होणे गरजेचे आहे.'' असंही सुळेंनी या अगोदर म्हटलेलं आहे.

Supriya Sule and Devendra Fadnavis
Sambhaji Bhide News : ''जरांगे पाटलांनी लक्षात घेतलं पाहिजे की...'' ; संभाजी भिडेंचं मोठं विधान!

याशिवाय, राज्यात अशी गोंधळाची परिस्थिती असताना काही दिवसांअगोदर गृहमंत्री फडणवीस छत्तीसगडला गेले होते. त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती, ''महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे. ‌याकाळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे.परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेंव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते.'' असं त्यांनी म्हटलं होतं.

Supriya Sule and Devendra Fadnavis
Nitesh Rane - Manoj Jarange Patil : " माझी किंमत भाजपला माहितीय, पण तुमची..."; राणेंचा जरांगे पाटलांना खोचक सल्ला

तसेच ''अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेंव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी.'' अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com