Suresh Mhatre : खासदार झाल्यानंतर दोन दिवसांतच बाळ्या मामा अ‍ॅक्शन मोडवर; कपिल पाटलांशी पंगा...

Kapil Patil : कपील पाटलांनी सर्व आरोप फेटाळत खासदार सुरेश म्हात्रे यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे.
Kapil Patil, Suresh Mhatre
Kapil Patil, Suresh MhatreSarkarnama

Bhiwandi Political News : भिंवडीतील शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा कामाला लागले आहेत. त्यांनी काल्हेर येथील शासकीय, वन विभागाची आणि स्थानिकांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप माजी खासदार कपिल पाटील यांच्या पुतण्यावर केला आहे.

या प्रकरणातून त्यांनी थेट पाटलांशीच पंगा घेतल्याचे बोलले जाते. त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत पाटीलही बाळ्या मामांना Suresh Mhatre कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. त्यामुळे आजी-माजी खासदारांतील वाद पुढील काळात चिघळण्याची शक्यता आहे.

म्हात्रे म्हणाले, काल्हेर येथील सुमारे 26 एकर शासकीय जमीनीसह वन विभाग व स्थानिकांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यात बिल्डर श्रीधर पाटील, नितीन पाटील, भरत पाटील यांचा सहभाग आहे. त्यावर त्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे, असा आरोप खासदार म्हात्रेंनी केले आहेत. तसेच हे बिल्डर लोक माजी खासदार कपिल पाटील व त्यांचे पुतणे देवेश पाटील यांच्या नावाने शेतकरी आणि नागरिकांना धमकावतात. स्थानिक गुंडांना हाताशी धरून लोकांची फसवणूक करतात, असेही त्यांनी सांगितले.

काल्हेर येथील संबंधित जमिनीवर अनधिकृत बांधकाम सुरू आहे. या जमिनी बळकावणे आणि अनधिकृत बांधकामांबाबत तहसीलदार, उप विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, एमएमआरडीएकडे पुरव्यांसह तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, खासदार म्हात्रेंच्या आरोप कपिल पाटील Kapil Patil यांच्यासह कुटुंबीयांनी फेटाळले आहेत.

Kapil Patil, Suresh Mhatre
Eknath Shinde : बारणे की जाधव..? खासदारकीचं मैदान मारलेले शिंदेंचे शिलेदार आता मंत्रि‍पदासाठी झुंजणार!

बाळ्या मामा यांनी आरोप केलेल्या प्रोजेक्टमध्ये आमचा कोणताही संबंध नाही. त्यांनी संबंधित प्रोजेक्टचे कागदपत्र तपासावेत. त्यानंतर त्यात त्यांच्याच नेत्यांचे नावे समोर येईल. त्यांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपावर वकिलामार्फत कायदेशीर नोटीस बजावणार आहोत, असे कपिल पाटील आणि देवेश पाटील यांनी स्पष्ट केले. खासदार होताच बाळ्या मामांच्या आक्रमक पवित्र्याची चर्चा भिवंडीत सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Kapil Patil, Suresh Mhatre
Sangli Politics : सांगलीत विश्वजीत कदमांची चाल; विशाल पाटलांचा विजय अन् जयंत पाटील 'चेकमेट'!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com