Suresh Mhatre News: 'जिनके घर शीशे के होते है, वो दूसरो के घर पर...'बाळ्यामामांचा कपिल पाटलांवर पलटवार

Bhiwandi Lok Sabha 2024: माझ्या गोदाम व्यवसायामुळे परिसरातील 90 हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. भिवंडी परिसरात अनधिकृत गोदाम व्यवसाय हे कपिल पाटलांच्या आशीवार्दामुळे सुरू आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.
Suresh Mhatre News
Suresh Mhatre NewsSarkarnama

Bhiwandi News: भिवंडी लोकसभेसाठी (Bhiwandi Lok Sabha 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP-SP’s declaration) सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा (Suresh alias Balya Mama Mhatre) यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर झाली. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या गोदामांवर आज एमएमआरडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. येवई येथील आर के लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीएने कारवाई केली आहे.

"संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, उच्च न्यायालयातून स्थगितीचे आदेश घेतले आहेत," असे स्पष्टीकरण सुरेश म्हात्रे यांनी दिले आहे. राजकीय दबावामुळे ही कारवाई करण्यात येत आहे, असे म्हात्रे यांनी सांगितले.

'जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरो के घर पर पत्थर नहीं फेका करते,'असे सांगत सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. माझ्या गोदाम व्यवसायामुळे परिसरातील 90 हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. भिवंडी परिसरात अनधिकृत गोदाम व्यवसाय हे कपिल पाटलांच्या आशीवार्दामुळे सुरू आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Suresh Mhatre News
Lok Sabha 2024: ठाकरेंचे उमेदवार ईफ्तार पार्टीत, तर शिंदेंचे मेट्रोत; डिजिटल प्रचारातही प्रत्यक्ष भेटीवर भर

भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी आग्रही होती. डिसेंबर महिन्यात सुरेश म्हात्रे यांच्या मुलीच्या लग्न स्वागत समारंभास शरद पवार यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी पवार आणि म्हात्रे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने लोकसभा निवडणुकीत भिवंडीचे उमेदवार म्हणून म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.

म्हात्रे यांनीदेखील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना खुले आव्हान करत निवडणुकीच्या रिंगणात आपलाच सामना करायचा असल्याचे पाटलांना वारंवार संकेत देत होते. अखेर म्हात्रे यांची गुरुवारी उमेदवारी जाहीर झाली. आता भिवंडीत पाटील विरुद्ध म्हात्रे असा सामना रंगणार आहे.

भाजपचे कपिल पाटील हे 2014 आणि 2019 असे सलग दोन वेळेस भिवंडी लोकसभेतून विजयी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी काँग्रेसचे सुरेश टावरे यांचा एक लाख 56 हजार 329 मतांनी पराभव केला. कपिल पाटील यांना 5 लाख 23 हजार 583 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना 3 लाख 67 हजार 254 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी 51 हजार 455 मते घेतली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com