Sushma Andhare : वारकर्यांच्या आक्रमकतेेनंतर सुषमा अंधारेंचा जाहीर माफीनामा; म्हणाल्या...

Sushma Andhare : वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये...
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama

पुणे: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह भाषणाच्या व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. त्यात अंधारे यांनी संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्याविषयी केलेल्या विधानांवरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. ठिकठिकाणी त्यांचा आंदोलनं, मोर्चांद्वारे तीव्र निषेध व्यक्त कऱण्यात येत आहे. आता यावर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी वारकर्यांची जाहीर माफी मागितली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच अंधारे यांच्याविरोधात वारकरी संप्रदायाकडून अंधारे यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत माफी मागावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. नाहीतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला गेला होता.

Sushma Andhare
Ratnagiri : मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी सामंतांचे तगडे नियोजन; 130 बसगाड्या अन् गटनिहाय ३ हजार कार्यकर्त्यांचे उद्दिष्ट!

याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वारकर्यांची माफी मागितली आहे. अंधारे म्हणाल्या, माझ्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागते. माझ्या भाषणांमधून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असल्यामुळं माझे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत. मी कबीरपंथीय असल्यानं कुणाच्याही श्रद्धेच्या आड येत नाही, कर्मकांड न मानता चैतन्य मानते. तरीदेखील माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकीय सूडबुद्धीतून माझा विरोध केला जात आहे. तसेच वारकऱ्यांनी राजकारणात घुसू नये असं रोखठोक मत देखील अंधारे यांनी यावेळी व्यक्त केलं.

Sushma Andhare
Ajit Pawar News : पडद्यामागे मधल्या सहा दिवसांत घडामोडी झालेल्यात; अजितदादांनी स्पष्टच सांगितले

यावेळी त्यांनी भाजपच्या वारकरी आघाडीवर देखील टीकेची झोड उठवली. अंधारे म्हणाल्या, भाजप पुरस्कृत वारकरी आघाडीचेच लोक माझी बदनामी करण्यात आघाडीवर आहेत. त्यांच्याकडूनच माझे जुने भाषणाचे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे. जे लोक कधीच वारीत पायी चालले नाही, कोरोनाकाळात याच लोकांनी स्टंट केला होता, आता तेच माझ्यावर टीका करत आहेत. माझा निषेध करण्यासाठी वारकऱ्यांनी काल माझी अंत्ययात्रा काढली. या देशात अनेक सुधारकांच्या प्रेतयात्रा काढण्यात आलेल्या असून माझी भाजपच्या वारकऱ्यांनी दखल घेतल्याबद्दल आनंदी आहे असा उपरोधिक टोलाही अंधारे यांनी विरोधकांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com