Ajit Pawar News : पडद्यामागे मधल्या सहा दिवसांत घडामोडी झालेल्यात; अजितदादांनी स्पष्टच सांगितले

Ajit Pawar News : राज्य सरकारने यंदा जाहीर केलेला अनुवादित साहित्यासाठीचा पुरस्कार रद्द केला.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

Ajit Pawar News : राज्य सरकारने यंदा जाहीर केलेला अनुवादित साहित्यासाठीचा पुरस्कार रद्द केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारवर विरोधकांकडून परखड शब्दांत टीका केली जात आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.

जून महिन्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार सत्तेत आले. मात्र, तेव्हापासून वेगवेगळ्या गोष्टी थांबायलाच तयार नाहीत. कुठलंही सरकार सत्तेत आल्यानंतर लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न होता. मात्र, ज्या दिवसापासून हे सरकार आले, तेव्हापासून आजपर्यंत रोज काही ना काही नवीन वाद काढायचे आणि समस्या निर्माण करायच्या त्यातून महत्त्वाच्या प्रश्नांबाबतचे लक्ष दुसरीकडे वळवायचे. माझे तर स्पष्ट मत आहे की बेरोजगारी आणि महागाई हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे पवार म्हणाले. मात्र, आता यांनी कहर केलाय, अशा शब्दांत पवार शिंदे सरकारला फटकारले.

Ajit Pawar News
Bhalchandra Nemade : हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचीच ही फळं; भालचंद्र नेमाडेंचा घणाघात!

सरकारचा साहित्य क्षेत्रातला हस्तक्षेप निषेधार्ह आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून साहित्य, कला, संस्कृतीचा वेगळा आदर ठेवला गेला आहे. तीच परंपरा सगळ्यांनी पुढे चालवली पाहिजे. ६ डिसेंबर २०२२ रोजी राज्य सरकारने २०२१ वर्षातील उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी पुरस्कार जाहीर केले होते. त्यात अनुवादित साहित्यासाठी अनघा लेले यांना कोबाड गांधी यांच्या पुस्तकाच्या अनुवादासाठी ही पुरस्कार जाहीर झाला होता.

Ajit Pawar News
Gram Panchayat Election : शिंदे गटाने भास्कर जाधवांना घेरले; घरच्या मैदानावर चितपट करण्याची तयारी

याबाबत पडद्यामागे मधल्या ६ दिवसांत काही घडामोडी झालेल्या दिसते. त्यामुळेच १२ तारखेला सरकारने अचानक शासकीय आदेश काढला. पुरस्कार निवड समिती बरखास्त केली. जाहीर झालेला पुरस्कारही रद्द केला. सरकारने त्यात हस्तक्षेप करणे गैर आणि निषेधार्ह आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com