Sushma Andhare Vs Raj Thackeray : सुषमा अंधारे राज ठाकरेंना लईच बोलल्या; 'जेवायला बसतो नेमकं त्याच पंक्तीचं...'

Maharashtra Politics : फोडाफोडी करून भाजपने मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री पवार यांना साथीला घेतले. त्यानंतर राज ठाकरेंनीही महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यांचे मनसुभे मात्र ठाकरे-पवार-पटोलेंनी धुळीस मिळवले आहेत.
Sushma Andhare, Raj Thackeray
Sushma Andhare, Raj ThackeraySarkarnama

Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीत देशात एनडीए आघाडीला 294 जागा मिळाल्या असल्या तरी राज्यातून मात्र महायुतीला मोठा फटका बसला आहे. लोकसभेच्या 48 जागांपैकी महायुतीला 18 जागा राखता आल्या. तर आघाडीला 29 जागा खेचण्यात यश आले आहे. या निकालावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्‍या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणानंतर आम्हीच कसे बरोबर आहोत, हे दाखवून देण्यासाठी भाजपने तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साम-दाम-दंड-भेदाची नीती अवलंबली. अखंड शिवसेनेतून एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीतून अजित पवार, काँग्रेसचे अशोक चव्हाणांसारखे मातब्बर मंडळींना आपल्या गोटात ओढून घेतले. यातच राज ठाकरेंनीही बिनशर्त पाठिंबा दिला. यातून त्यांना लोकसभेत संख्याबळ वाढवून पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्याचा मनसुभा होता. तो ठाकरे-पवार-पटोलेंनी धुळीस मिळवला आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी ठाणे आणि कल्याणमधील महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारसभेत सुषमा अंधारेंचा जुना व्हिडिओ दाखवून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. त्याला अंधारेंनीही सडेतोड उत्तर देत राज ठाकरेंचा समाचार घेतला होता. लोकसभेत राज्यात आघाडीला 29 जागा मिळाल्या आहेत. तर मुंबईतही निर्भेळ यश मिळाले आहे. यानंतर अंधारेंनी पोस्ट करून आता कुणालाच सुटी नाय म्हणत राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मुंबईत घवघवीत यश मिळाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवसणारी एक फेसबुक पोस्ट केली आहे. यात सुषमा अंधारेंनी राज ठाकरे यांचा एक फोटो पोस्ट केला आणि म्हणाल्या, च्यायला मी ज्या पंक्तीला जेवायला बसतो नेमकं तिथेच जेवण कसं संपत? असे म्हणत आता कुणालाच सुट्टी मिळत नसते, असा इशाराही दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com