Raigad News : रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर येथे संशयास्पद बोट आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 व लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे. आढळल्याची माहिती मिळत आहे. यामुळे जिल्हा आणि पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोचले आहे. यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही या बोटीमध्ये एकही व्यक्ती नव्हता, असेही सांगण्यात येत आहे. तसेच ही बोट ओमान सेक्यरीटीची असल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे.या प्रकरणाचा तपास सुरू असून या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. (Raigad Suspected Boat Latest News)
आढळलेली संशयास्पद बोट ही स्पिडबोट असून ही संशयास्पद नाही मात्र याबाबात चौकशी करणार, अशी माहिती ATS प्रमुख विनीत अग्रवाल यांनी दिली आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. हरिहरेश्वर येथील समुद्र किनारी आढळलेल्या या बोटीमध्ये दोन तीन एके-47 आढळल्याचे सांगण्यात येत असून ही बोट ओमान सेक्यरीटीची असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. तसेच जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीही पोलिसांना काही संशयास्पद बोटी किनाऱ्यावर असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. मात्र आज ही बोट आढळून आली आहे.
दरम्यान, शस्त्र असलेली बोट आढळल्याने परिसरात आणि राज्यात खळबळ उडाली आहे. यामुळे मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. या हल्ल्यातील दहशतवादी सुद्धा समुद्र मार्गेच आले होते. शिवाय, मुंबईत 1993 मध्येही झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्स देखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. या सगळ्या घटनांचा विचार करता पोलीस प्रशासनाची चिंता वाढली आहे. यामुळे जलद गतीने तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच, रायगड घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने तपास यंत्रणांच्या संपर्कात असून थोड्याच वेळात ते सभागृहात यासंदर्भात निवेदन करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.