Raju Shetti : 'कृषी सेवा केंद्राकडून हप्ते, वर पैसे पाठवणं अन् अजून बरंच बाहेर यायचंय'; राजू शेट्टींना नेमकं काय म्हणायचंय?

Swabhimani Shetkar Sangathan Raju Shetti corruption allegations Beed Minister Dhananjay Munde Baramati : तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया.
Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
Published on
Updated on

Mumba News : तत्कालीन कृषीमंत्री आणि सध्याचे अन्न, नागरी, पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे.

या आरोपांनी राज्याच्या राजकारण खळबळ उडवून दिली असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले, "हे हिमनदीचे एक टोक आहे. अजून बरचंस बाहेर येणार आहे. कृषी सेवा केंद्रांकडून कशाप्रकारे हप्ते घेतले जातात. कृषी विकास अधिकारी काय काय धंदे करतात. हे बाहेर यायचं आहे. प्रश्न विचारला तर ते म्हणतात, वर आम्हाला पैसे पाठवावे लागतात. वर म्हणजे कोणते ठिकाण? याचा शोध घेणे गरजेचे आहे".

Raju Shetti
Arvind Sawant : भारतीयांना बेड्या ठोकून आणलं, अन् 'हे' दिल्ली तख्तासाठी डुबकी घेत होते; ठाकरेंच्या शिलेदाराचा भाजपच्या हिंदुत्वावर निशाणा

राज्यातील शेती प्रश्नावर बोलताना राजू शेट्टी यांनी चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी (Farmer) लढतोय अन् लढायचे आहे. पण त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही, असे सांगून राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचनचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करून चार वर्षे झाली, तरी ते मिळाले नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Raju Shetti
Buldhana Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आमदार मिटकरी संतापले; म्हणाले, 'आरोपीचा 'एन्काऊंटर' करा'

निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीने तीन लाखांपर्यंतचे कर्जमाफ करायचे आश्वासन दिले. त्याला वरचढ म्हणून महायुतीच्या नेत्यांनी सातबारा कोरा करण्याची घोषणा केली. आज देशात सर्वाधिक थकबाकीदार शेतकरी महाराष्ट्रातील आहे, अन् ही गंभीर बाब आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.

कांद्याच्या निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांची वाटोळे झाले. मागील वर्षी साखर निर्यात बंदी केली. त्यामुळे अपेक्षित भाव मिळाला नाही. दूध दरासाठी शेतकरी आक्रोश करतोय. सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नाही. याला केवळ सरकारचे धोरण कारणीभूत आहे. हे सर्व होत असताना शेतकऱ्यांमध्ये राग यायला पाहिजे, तो येताना दिसत नाही. उलट दीड-दमडीच्या राज्यकर्त्यांच्या मागे पळण्यात शेतकरी धन्यता मानतात, असा संताप देखील राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com