राऊतांच्या अडचणीत वाढ ; 'ठाकरे' सिनेमाची निर्मिती पत्राचाळ घोटाळ्याच्या पैश्यातून ? ; पाटकरांचा आरोप

Sanjay Raut : राऊतांच्या विरोधात आता ईडीने 4000 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
sanjay raut
sanjay rautsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गोरेगाव पत्राचाळ (Patrachal) गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत त्यांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत असणार आहे.

राऊतांच्या विरोधात आता ईडीने 4000 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आले आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राऊतांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पत्राचाळ प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांनी राऊतांवर गंभीर आरोप केला आहे. ठाकरे सिनेमाच्या निर्मितीत पत्राचाळ घोटाळ्याचा पैसा वापरण्यात आल्याचा दावा पाटकर यांनी केला आहे.

राऊतांनी बेनामी कंपन्यांमध्येही पैसा वळवल्याचा आरोप स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. 2019 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर ‘ठाकरे’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली. या चित्रपटाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

sanjay raut
'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदेंची दिल्लीवारी ; सहकारी मंत्र्यांसोबत निवडणूक आयोगासमोर परेड ?

ईडीने राऊतांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये राऊतांना दोषी ठरवण्यात आले आहे. पत्राचाळ घोटाळ्यातले मास्टर माईंड ठरविले आहे.पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमावले, अशा प्रकारचा आरोप या आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे.

संजय राऊतांनी वाधवान बंधूशी संगनमत करून पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचे ईडीनं आरोपपत्रात म्हटले आहे. पत्राचाळ प्रकरणातील प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचेही आरोपपत्रात म्हटलं आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आल्याचा उल्लेख या आरोप पत्रात ईडीनं केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com