राष्ट्रवादीतून आयात केलेल्या ताई निष्ठा शिकवतात : शितल म्हात्रेंचा खोचक वार!

Sheetal Mhatre : ताईंनी शिवसेनेचा झेंडा कधी पकडला नाही. कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्या नसतील.
Sushma Andhare Sheetal Mhatre
Sushma Andhare Sheetal MhatreSarkarnama

मुंबई : शिवसेनेत फूट पडून महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेचा पहिली मेळावा पार पडला. शिंदे गटाचाही पहिला दसरा मेळावा बीकेसीवर झाला. तर उद्धव ठाकरेंनी आपल्या परंपरेनुसार शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीका -टिप्पणी झाली. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता शिंदे गटाच्या नेत्या व माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रीया दिली. त्यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

शिल्लक सेनेचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला, यामध्ये कोणीतरी एक ताई भाषण करत होत्या. त्या ताई दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीतून आयात करून शिवसेनेत आणल्या गेल्या. या ताईंनी शिवसेनेचा झेंडा कधी पकडला नाही. शिवसेनेच्या कोणत्याही आंदोलनात सहभागी झाल्या नसतील पण, शिवसेनेत ज्यांनी आयुष्य घालवलं. अंगावर अनेक केसेस घेतल्या, त्यांच्यावर या काल आलेल्या ताई बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांना निष्ठा शिकवत होत्या, त्यांना गद्दार म्हणत होते. हे तुम्हाला कसं काय जमतं बुवा? देव जाणे?, असे म्हात्रे म्हणाले.

Sushma Andhare Sheetal Mhatre
Dasara Melava : सुषमा अंधारेंनी गाजवली सभा, सोशल मिडीयावर भाषणाची जोरदार चर्चा!

काय म्हणाले होत्या सुषमा अंधारे ?

शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथात इतर धर्माचा द्वेष करा, असं लिहलं आहे ते सांगावे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अनेक मुस्लिम आज शिवसेनेच्या जवळ येत असल्यामुळेच अनेकांना त्याचा त्रास होत आहे, असेही अंधारे म्हणाल्या. शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचे विचार ऐकायचे का ? असे नारायण राणे म्हणाले होते. याचा समाचार घेत अंधारे यांनी राणेंवर टीका केली. याच सोनिया गांधींच्या पायावर दहा वर्षे लोटांगण घालत काँग्रेसमध्ये आमदार, खासदार, मंत्रिपदे मिळवली त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी, हे फार हास्यास्पद आहे,' प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे आदी त्यांचे विद्यमान मतदारसंघ जागा भाजपला देण्याची हिंमत दाखवतील का, असा सवालही त्यांनी केला.

Sushma Andhare Sheetal Mhatre
Dasara Melava : सुषमा अंधारेंनी गाजवली सभा, सोशल मिडीयावर भाषणाची जोरदार चर्चा!

शिवाजी पार्कवर जाऊन सोनियांचे विचार ऐकायचे का ? असे नारायण राणे म्हणाले होते. याचा समाचार घेत अंधारे यांनी राणेंवर टीका केली. याच सोनिया गांधींच्या पायावर दहा वर्षे लोटांगण घालत काँग्रेसमध्ये आमदार, खासदार, मंत्रिपदे मिळवली त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी, हे फार हास्यास्पद आहे,' प्रताप सरनाईक, श्रीकांत शिंदे आदी त्यांचे विद्यमान मतदारसंघ जागा भाजपला देण्याची हिंमत दाखवतील का, असा सवालही त्यांनी केला.

ईडीमुळेच या सर्वांना हिंदूत्व आठवले आहे. मात्र ठाकरे यांनी कधीच हिंदूत्वाला सोडले नाही. दिवंगत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या पत्नी उमेदवार असतानाही, शिंदे गटाने त्यांना पाठिंबा द्यायला हवे, मात्र त्यांनी ती जागा भाजपला दिली. यावेळी त्यांनी राणे यांच्या मुलांचा उल्लेख ‘वाह्यात बाजारबुणगे’ असा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com