Teachers and Graduate constituency Election : भाजपच्या 'या' पाच नेत्यांवर मोठी जबाबदारी

BJP NEWS : येत्या ३० जानेवारी रोजी ही निवडणूक होत आहे.
BJP NEWS
BJP NEWS sarkarnama

BJP NEWS : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर (Teachers and Graduate constituency Election) मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. (Teachers and Graduate constituency Election bjp news update)

अमरावती, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण या विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. नाशिक आणि अमरावती हे पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक मतदारसंघात निवडणूक जाहीर झाली आहे.

BJP NEWS
Vidhan Parishad election News : नागपूर शिक्षक मतदारसंघातून कोण रिंगणात ?

राज्यात सत्तातर झाल्यानंतर भाजप आपले संख्याबळ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपने यासाठी पाच नेत्यांवर प्रमुख जबाबदारी दिली आहे. हे पाच प्रमुख नियोजनबद्ध रणनीती आखत आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

आमदार डॉ. संजय कुटे (अमरावती पदवीधर), आमदार राणा जगजितसिंह पाटील(औरंगाबाद विभाग शिक्षक), सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (कोकण विभाग शिक्षक) , आमदार मोहन मते (नागपूर विभाग शिक्षक), ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (नाशिक पदवीधर), या पाच नेत्यांनी शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. येत्या ३० जानेवारी रोजी ही निवडणूक होत आहे.

BJP NEWS
Solapur News : निवडणुकीचे आव्हान देणाऱ्या देशमुखांना काडादींनी करुन दिली 'त्या' पराभवाची आठवण

विधान परिषदेत भाजपचे २२ इतके संख्याबळ आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजपचे संख्याबळ कमी आहे.त्यामुळे भाजपा या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरला आहे. आपली शक्ती पणाला लावली आहे. भाजपला आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत संख्याबळ वाढविण्याची संधी आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीचे २८ सदस्य आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com