Cabinet Decision: शिंदे-फडणवीस सरकारचे दहा मोठे निर्णय; शेतकऱ्यांना होणार 'हा' फायदा

Political News: शालेय विद्यार्थ्यांसाठी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Cabinet Decision
Cabinet DecisionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.13 जून ) राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने 10 मोठे निर्णय घेतले आहेत. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यापुढे सुधारित दराने मदत मिळणार आहे. यासाठी तब्बल 1500 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते. आता या शेतकऱ्यांना नवीन सुधारित दराने मदत देण्यात येणार आहे. या सुधारित दाराप्रमाणे जिरायत शेत जमिनीसाठी 8 हजार 500 तर बागायत जमिनीसाठी 17 हजार रुपयांप्रमाणे मदत मिळणार आहे.

Cabinet Decision
Raver Loksabha Election: रक्षा खडसेंना लोकसभेचं तिकीट मिळणार की कापलं जाणार? गिरीश महाजनांनी दिलं उत्तर

याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणते 10 मोठे निर्णय झाले?

- सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार. 1500 कोटींची मान्यता. (मदत व पुनर्वसन विभाग)

- कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय. आता मिळणार १६ हजार रुपये. (ग्राम विकास)

- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा. (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

- पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती वाढवली. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)

- लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करणार. (पशुसंवर्धन विभाग)

- पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. (विधि व न्याय विभाग)

- अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ. (विधि व न्याय विभाग)

- मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता पुनर्वसन गृह योजना. (दिव्यांग कल्याण विभाग)

- स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढवली. (महसूल विभाग)

- चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार. (महसूल विभाग)

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com