'ठाकरे सरकार पडू शकतं,' कुमार केतकरांना फडणवीसांनी दिलं उत्तर..

केतकरांच्या या विधानावरुन उलटसुलट चर्चा सध्या सुरु आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Devendra Fadnavis,Kumar Ketkar
Devendra Fadnavis,Kumar Ketkarsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''देशातील पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकीला निकाल नुकताच जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपला तब्बल चार जागांवर घवघवीत यश मिळालं. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी मिशन लोटस मोहिम वापरुन महाविकास आघाडी सरकार अस्थिर करु शकतं. महाराष्ट्रातील सरकार (Thackeray government)कधीही पडू शकतं,'' असं विधान काँग्रेस पक्षाचे खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar)एका कार्यक्रमात काही दिवसापूर्वी केलं आहे.

केतकरांच्या या विधानावरुन उलटसुलट चर्चा सध्या सुरु आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ''कुमार केतकर हे ज्येष्ठ संपादक आहेत,त्यांनी अनेक वर्ष राजकारण जवळून पाहिले आहे. त्यामुळे त्यांनी तरी अशी हास्यास्पद विधानं करु नयेत,''

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ काल राजभवनावर दाखल झालं होतं. यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नागरी व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा समावेश होता. राज्यपालांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांना केतकरांच्या सरकार पाडण्याबाबतच्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.

"राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावणार? नेमकं कारण काय? आज महाविकास आघाडी सरकारकडे 170 चं बहुमत आहे. लोकशाहीमध्ये बहुमताच्या आकड्याला महत्त्व असतं. राष्ट्रपती राजवट कोणत्या आधारावर लावता येईल ? महाविकास आघाडी सरकार बहुमताचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी, कष्टकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकार करत आहे. किंबहुना राज्याने या कोरोना काळाचा सामना समर्थपणे केला आहे. आपल्या राज्याचं अनुकरण इतर राज्यांनीही केलं आहे. राज्याचं विधीमंडळात सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असं आहे. असं असताना आणि बहुमताचं सरकार असताना राष्ट्रपती राजवट लावण्याचं कारण काय?", असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

Devendra Fadnavis,Kumar Ketkar
पाच राज्यात भुईसपाट केल्यानंतर मोदी देणार कॉग्रेसला आणखी मोठा धक्का

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी (८ मार्च) विधानसभेतच एक स्टिंग ऑपरेशन सादर केलं. यामध्ये त्यांनी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Pravin Chavan)यांचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे. राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकील मिळून विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र आखत असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषदेत प्रविण चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. "प्रवीण चव्हाण हे वकील आहेत तसा मी ही वकील आहे. प्रविण चव्हाण यांच्या व्हिडीओ बाबत मी फॉरेन्सिक रिपोर्ट ही मिळवला आहे.याबाबात मी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. जर सरकराने हे प्रकरण सीबीआयला दिले नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ. प्रविण चव्हाण यांच्यावर आरोप केल्यानंतर तीन दिवस चव्हाण का बोलले नाही. याचाच अर्थ चव्हाण हे राज्य सरकारशी बोलून उत्तर देत आहेत, असेही फडणवीसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com