मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील शुक्रवारचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोविड सेंटरवरुन भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना इशारा दिला आहे. येत्या दहा दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या आज माध्यमांशी बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, ''मुंबईत कोरोनाचा रुग्णसंख्येचा आकडा जरी वाढला असला तरी कोविड सेंटर्स रिकामे पडले आहेत. बीकेसी मध्ये 2400 बेडपैकी 800 बेड्स वर रुग्ण अॅडमिट आहेत. दहिसरमध्ये 750 बेड्स आहेत पण अजून एक पण रुग्ण नाही. नेस्को गोरेगाव मध्ये 2000 बेड्सपैकी 900 रुग्णांनी बेड्स भरले आहेत. याचा अर्थ 98 टक्के रुग्ण आहे आपल्या घरी किंवा नर्सिंग होममध्ये बरे होतात. ज्यांचे लसीकरण झाले त्यातील 99.99 लोक हे सुरक्षित आहेत,''
''सत्ताधारी नेते आणि काही आयएएस अधिकारी यांच्यासाठी कोविड सेंटर हे कमाईचे साधन बनले आहे. येत्या दहा दिवसात ठाकरे सरकारचा कोविड सेंटर घोटाळा प्रसिद्ध करेन, असा इशारा सोमय्या यांनी दिला.
भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहुन तक्रार केली आहे. सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तपास करण्याची विनंतीही त्यांनी पत्रातून केली आहे. शेलारांना आलेल्या धमकीबाबत सोमय्या म्हणाले, '' शेलार यांना धमकीचे फोन येत आहेत. बघूया ठाकरे सरकार कशी काळजी घेतात,''
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.