Vinayak Raut: शिवसेना संपवणार, म्हणणारा अजून जन्माला आला नाही; राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

Thackeray group leader Vinayak Raut attacked mp Narayan Rane: राणेंना वाटत असेल मी जबरदस्तीने बेसुमार संपत्ती गोळा करायला मोकळा आहे, पण शिवसेना त्यांना आपलं अस्तित्व दाखवून देईल, अशा शब्दात राऊतांनी त्यांना इशारा दिला आहे.
Vinayak Raut
Vinayak Raut,Narayan Rane:Sarkarnama
Published on
Updated on

कोकणातील राजकारणात ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि भाजपचे खासदार , माजी मंत्नी नारायण राणे (Narayan Rane) यांचे विळ्या-भोपळ्यांचे नाते जगजाहीर आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. कोकणातून शिवसेना संपवणार असा इशारा देणाऱ्या नारायण राणेंना राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेना कोकणातून संपवली म्हणणाऱ्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणेंना ते पडलेलं दिवा स्वप्न आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिलेल्या राणेंना निवडून यायला 120 कोटी रूपये वाटावे लागलात. त्यामुळे शिवसेना संपवणार म्हणणारे अजून जन्माला आलेले नाहीत. नारायण राणेंना वाटत असेल मी जबरदस्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेसुमार संपत्ती गोळा करायला मोकळा आहे,पण शिवसेना त्यांना आपलं अस्तित्व दाखवून देईल, अशा शब्दात राऊतांनी त्यांना इशारा दिला आहे.

नारायण राणेंचा जीव रिफायनरीमध्ये गुंतला आहे. बारसु रिफायनरीला विरोध करणाऱ्यांना परत पाठवणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. मी बारसूला जाणार असून बारसू आणि नाणार प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार आहे. ही रिफायनरी नारायण राणेंना कोकण वासीयांसाठी नाही तर तिथे आलेल्या 341 परप्रांतीय भुमाफीयांसाठी हवी आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीवर राऊतांनी टीका केली आहे. आमच्यावर जातीयवादाची मते घेतल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपलाविधान परिषदेच्या निवडणुकीत एमआयएम आणि समाजवादी पक्षाची मते घेताना लाज वाटली नाही का? किती मते घेऊन तुम्ही निर्लज्ज झालात ते जाहीर करा. भाजपला समाजवादी पार्टी आणि एकनाथ शिंदेना एमआयएमची मते चालतात आणि आमच्यावर जातीयवादाचा आरोप करतात, असा आरोप त्यांनी केला आहे.

Vinayak Raut
MLC Election 2024: काँग्रेसचे 'फितूर' आमदार कोण? क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांचा अहवाल हायकमांडच्या दरबारी

नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत मते विकत घेतली, त्यांनी मतदारांना धमकावले आणि विजय मिळवल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला होता.याप्रकरणी त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राणे यांनी मिळवलेला विजय रद्द करा,निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती राऊतांनी याचिकेत केली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती त्यांनी याचिकेत केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com