Sanjay Raut: हे प्रोटोकॉल, संविधानाला धरून आहे का? चंद्रचूड अन् मोदींना राऊतांचा प्रश्न

PM Modi Visits Residence of CJI DY Chandrachud Participate in Ganesh Pooja: प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश मग ते कोणीही असो की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही.
PM Modi visits residence of cji dy chandrachud participate in ganesh pooja
PM Modi visits residence of cji dy chandrachud participate in ganesh pooja Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त गणपतीची स्थापना झाली आहे. बुधवारी त्यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आरती करण्यासाठी आले होते. गांधी टोपी परिधान करुन मोदींनी गणेश पूजा केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणेशाची आरती केल्याची ही पहिलीच घटना आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि डीवाय चंद्रचूड यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.

चंद्रचुड हे देशाचे सरन्यायाधीश आहेत, नोव्हेंबरमध्ये ते निवृत्त होतील, गणेशोत्सवासाठी पंतप्रधान किती जणांच्या घरी गेले त्याची माझ्याकडे माहिती नाही, पण काल (बुधवारी) सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले, त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला, धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र सर्वत्र पाहायला मिळालं, असा टोला राऊतांनी लगावला.

सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का? याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे, असे राऊत म्हणाले.आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न आला, प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश मग ते कोणीही असो की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही, तारखांवर तारखा का पडत आहेत. याबाबत आमच्या मनात आता शंका आहे, अशी संशय राऊतांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.

PM Modi visits residence of cji dy chandrachud participate in ganesh pooja
Sharad Pawar News: 'तुतारी'मीच फुंकणार! 'या' मतदारसंघातून दररोज एक जण शरद पवारांच्या भेटीला

सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यांसारखी व्यक्ती असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जातंय, घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जातंय, हे सरकार घटनाबाह्य आहे असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले, काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्यामुळे यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का? असा प्रश्न राऊतांना पडला आहे.

शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का, या लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या, असा टोमणा त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com