Uddhav Thackeray, Ajit Pawar,
Uddhav Thackeray, Ajit Pawar,sarkarnama

मोठी बातमी : कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले; मास्कपासूनही मुक्ती

State Government : राज्य सरकारने कोरोना काळातील सर्व निर्बंध हटवले

मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आज (ता. ३१) मार्च झालेल्या मंत्रीमंड बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत.

Uddhav Thackeray, Ajit Pawar,
बबनराव लोणीकरांना उपरती... अखेर वीजबिल भरले!

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनेचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, ''आज मंत्रीमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले. गुढी पाडव्याच्या मिरवणूक जोरात काढा. रमजान उत्सहात साजरा करा. डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त मिरवणूका जोरात काढा,'' असे आव्हाड म्हणाले आहेत.

त्याच बरोबर आता नागरिकांना मास्क पासूनही मुक्ती मिळाली आहे. मास्क ज्यांना वापरायचा असले त्यांनी वापरावा, त्याची सक्ती केली जाणार नसल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे. गुढीपाड्या निमित्त मिरवणूक काढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

राज्यातील बहुतांशी लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. वेगाने लसीकरण झाल्याने कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी कमी झाले आहे. त्यामुळे आता कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात निर्बंध सुरू होते. लॉकडाऊनमध्ये कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर त्यामध्ये काहीसी शिथिलता आणण्यात आली होती. आता राज्यातील कोरोना हा नियंत्रणात आल्याने राज्य मंत्रिमंडळाने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. निर्बंध हटवण्यात आल्यामुळे राज्यातील जनतेला गुढी पाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढता येणार आहे. तसेच रमजानचा सण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही उत्साहाने साजरी करता येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com