CM Eknath Shinde News : संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला मुख्यमंत्री धावले; ताफ्यातील रुग्णवाहिका दिलीच शिवाय...

Maharashtra News : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत असतात.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Thane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत असतात.अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे हे तत्परतेने धावून जातात. याचा प्रत्यय नेहमीच पाहायला मिळतो. पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी ( दि.८) गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. तेथील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आटोपून शिंदे हे मुंबईकडे परतत होते. ठाण्याकडे आपल्या निवासस्थानाकडे जात असताना वाटेत एक रुग्णवाहिका बंद पडलेल्या अवस्थेत दिसली. मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वत: तिथे जात चौकशी केली.

Eknath Shinde
NCP Split And Radhakrishna Vikhe Patil : ...म्हणूनच अजित पवार सरकारमध्ये; राधाकृष्ण विखेंनी सांगितलं कारण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत असतात. शिंदे यांचा संवेदनशीलपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा पहायला मिळाला. याचदरम्यान,मुख्यमंत्री शिंदे यांना एक रुग्णवाहिका उभी असलेली निदर्शनास आली. यानंतर शिंदेंनी तात्काळ आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून संबंधित रुग्णवाहिकेची चौकशी केली. लगेच ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन पुढे जाण्यास सांगितले. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं..?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) हे गडचिरोलीच्या दौऱ्यावर होते. तेथील नियोजित दौरा आटोपून ते ठाण्यात येत असताना त्यांना चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर रुग्णवाहिका बंद अवस्थेत उभी दिसली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून या रुग्णवाहिकेची चौकशी केली. यावेळी या रुग्णाचे नाव धर्मा सोनवणे असे असून त्याला नाशिकहून मुंबई(Mumbai) त उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणण्यात आले असल्याचे त्यांना समजले.

Eknath Shinde
NCP Split And Radhakrishna Vikhe Patil : ...म्हणूनच अजित पवार सरकारमध्ये; राधाकृष्ण विखेंनी सांगितलं कारण

संबंधित रुग्णाला दाखल करून घ्यायला नकार दिल्यानं त्याला पुन्हा नाशिककडे घेऊन जात असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं. यानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन करून या रुग्णाला दाखल करून त्यावर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच त्याला तात्काळ मदत करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊ केली. या मदतीनंतर सोनवणे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली 9 वर्षीय चिमुकल्याची जबाबदारी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी(दि.७) एका 9 वर्षीय चिमुकल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या चिमुकल्याला जन्मत: दोन हात नाहीत. पण त्याची जिद्द अफाट अशी आहे. तो आपल्या पायाच्या बोटांनी लिहितो. विशेष म्हणजे या चिमुकल्याचं भारतीय सैन्यात नोकरी करण्याचं स्वप्न आहे. त्याचं हे स्वप्न साकार करण्यासाठी शिंदे त्याला मदतीसाठी हातभार लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com