Thane Political News : ठाणे शहरात पार पडलेल्या पहिल्या महायुतीच्या मेळाव्यात आमदार निरंजन डावखरे, भाजप पदाधिकारी माधवी नाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आदींसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी 'आमचा उमेदवार नरेंद्र मोदी' असा नारा देत, तो उमेदवार कोण याचा विचार न करता केवळ महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं असा निर्धार यावेळी करण्यात आला.
ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचा पहिला मेळावा बुधवारी ठाण्यातील टीप टॉप प्लाझा मध्ये पार पडला. या मेळाव्याला शिवसेना प्रवक्ते तथा माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक(Pratap Sarnaik), माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, माजी खासदार संजीव नाईक, माधवी नाईक, राष्ट्रवादीचे प्रवत्ते आनंद परांजपे, नजीब मुल्ला, प्रभाकर सावंत आदीसह रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकीकडे ठाणे लोकसभेचा अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र महायुतीच्या मेळव्याच्या माध्यमातून बुधवारपासून मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ वाढवला आणि प्रचाराचा श्री गणेशा केल्याचे दिसत आहे. यावेळी महायुतीकडून आमचा उमेदवार नरेंद्र मोदी(Narendra Modi) असा नारा दिल्या गेल्याचं दिसून आलं.
तर "आमची मने आणि मतेही जुळलेली असून लवकरच महायुतीच्या ठाणे, कल्याण, पालघर येथील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. या शिवाय जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपमध्ये(BJP) कुठेही बंडखोरी झाली असे म्हणता येणार नाही. मात्र पाटील यांनी असा निर्णय घ्यायला नको होता," असेही भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असून, तिसऱ्यांदा संधी मिळाल्यास त्यांना विजयाची ते हॅटट्रिक करण्याची संधी आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.