High Court on Sameer Wankhede: समीर वानखेडेंना दिलासा; 24 मे पर्यंत अटक नाही

High Court on Sameer Wankhede | सीबीआय'ने आरोप पत्रात समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
Sameer Wankhede
Sameer WankhedeSarkarnama

High Court Hearing on Sameer Wankhede Case: अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने वानखेडेंना 24 मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 मे रोजी होणार आहे. (The High Court has directed the CBI not to arrest Sameer Wankhede till May 24)

Sameer Wankhede
PM Modi Big Decisions: मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण: नऊ वर्षात घेतले हे ऐतिहासिक निर्णय

न्यायालयाने वानखेडेंना (Sameer Wankhede News) 24 मे पर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सीबीआयला वानखेडे यांचा जबाब नोंदविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याच बरोबर वानखेडेंनाही सीबीआयला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच, २२ मे पर्यंत वानखेडे यांना सीबीआयला आपले म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे.

ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट यांनी आज उच्च न्यायालयात वानखेडे यांच्या बाजूने युक्तीवाद केला. सीबीआयने आरोपपत्रात केलेले आरोप खोडून काढण्यासाठी आम्ही समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान यांच्यात त्यावेळी झालेल्या चॅटींगची प्रत सादर केली. या सर्व संभाषणात शाहरुख आणि वानखेडे यांच्यात कुठेही पैशांबाबत चर्चा झाली नाही. पण वडील म्हणून शाहरुखने वानखेडे यांच्याकडे मुलासाठी विनंती केली होती. हेच या चॅटींगमध्ये होतं. तेच आम्ही न्यायालयात सादर केलं, अस मर्चंट यांनी यावेळी सांगितलं. (Sameer Khan - Aryan Khan news)

Sameer Wankhede
Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe Patil: राम शिंदे-विखे पाटलांमधील वादावर फडणवीस काय मार्ग काढणार ?

सीबीआय'ने वानखेडेंवर काय आरोप केलेत?

सीबीआयने सीबीआयने वानखेडे यांच्यावर आरोप पत्रात गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुखकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. पण हा सौदा १८ कोटींवर आला. यात किरण गोसावीने ५० लाख रुपये आगाऊ घेतले होते. इतकेच नव्हे तर, वानखेडेंना इतक्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, याचाही हिशोब देता आला नाही, तसेच फॉरेन ट्रिपचाही हिशोब देता आले नाही. (Sameer Wankhede CBI Raid)

सीबीआयकडून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे आणि इतरा काही जणांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. त्याच्या मुंबईतील घराच्या परिसराची य़ंत्रणेकडून झाडाझडती घेण्यात आली. वानखेडे यापूर्वी एनसीबीचे मुंबई झोनचे प्रमुख अधिकारी होते. सिनेअभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन याला अटक केल्यामुळे ते वादात भोवऱ्यात होते.

सीबीआयने त्यांची बहीण यास्मिन वानखेडे आणि वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या घरातून 28-28 हजार रुपये जप्त केले. वानखेडे यांच्या सासरच्या घरातूनही 1800 रुपये जप्त करण्यात आले. पत्नी आणि मुलांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी तब्बल 12 तास तपास पथक कारवाई करत होते.इतकेच नव्हे तर त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा फोन सीबीआय अधिकाऱ्यांनी हिसकावून घेतल्याचं स्वत: वानखेडे यांनी सांगितलं होतं. (CBI Raid )


Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com