
मुंबई : 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरुन सध्या मोठा प्रमाणात गाजत आहे. या चित्रपटाने कमाईचे आधीचे विक्रम मोडीत काढले आहेत. एकाच आठवड्यात शंभर कोटीपर्यंत बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्याची कामगिरी या चित्रपटाने केली आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे आगामी काळात अनेक विक्रम हा चित्रपट करेल, असा अंदाज आहे.
काश्मीर फाईल्स हा चित्रपट 11 मार्चला प्रदर्शित झाला आहे. एक आठवडा पूर्ण होण्याच्या आधीच चित्रपटाची कमाई 100 कोटींच्या जवळ पोचली आहे. काल सातव्या दिवशी चित्रपटाची बॉक्स ऑफीस कमाई 97.30 कोटी रुपयांवर गेली. काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांची व्यथा हा चित्रपट दाखवतो. काश्मीर खोऱ्यातील 1990 त्या दशकातील वातावरण या चित्रपटात मांडण्यात आले आहे. यात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट व्यवसायाचे विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे की, काश्मीर फाईल्सने आधीचे सगळे विक्रम मोडले आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ 3.55 कोटी रुपये कमावले होते. आता सातव्या दिवशी या चित्रपटाची कमाई 97.30 कोटी रुपये आहे. मध्यम बजेट असलेल्या चित्रपटाच्या व्यवसायात एवढी मोठी वाढ कधीच दिसून आली नव्हती.
मोदींकडून चित्रपट अन् दिग्दर्शकाचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) संपूर्ण मंत्रिमंडळ आणि भाजपचे (BJP) नेते या चित्रपटाचा प्रचार करताना दिसत आहे. काश्मिरी पंडितांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाचे आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे जाहीर कौतुक केले होते. काश्मीर पंडितांवरील अत्याचार दाखवणारा हा चित्रपट पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात, असे मोदी म्हणाले होते. याचबरोबर मोदींनी अग्निहोत्री हे निडर असल्याची प्रशंसाही केली होती.
महाराष्ट्रात करमुक्त नाही
दरम्यान, या चित्रपटावरून महाराष्ट्राच्या विधानसभेतही गोंधळ झाला होता. भाजप आमदारांनी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करत हा चित्रपट केंद्र सरकारने करमुक्त केला, तर तो निर्णय संपूर्ण देशात लागू होईल, असे सांगितले होते. पवार म्हणाले होते की, मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे चित्रपट करमुक्त केल्याची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी 'काश्मीर फाईल' सिनेमाचा उल्लेख केला आहे. केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण देशालाच तो लागू होईल. अगदी जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत करमुक्त होईल, असे पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.