Maharashtra Politics : कर्नाटकच्या विजयाने आघाडीला बळ; पवार, ठाकरे अॅक्शन मोडवर : बैठकीत ठरला 'हा' प्लॅन

Sharad Pawar News : महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांची बैठक मुंबईत झाली.
Leader of Mahavikas Aghadi
Leader of Mahavikas AghadiSarkarnama

Mahavikas Aghadi News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालाच्या पार्श्वभूमीवर आज (ता.14) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांची बैठक पार पडली.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार भाई जगताप, माजी आमदार नसीम खान उपस्थित होते.

Leader of Mahavikas Aghadi
DK Shivakumar News : डी. के. शिवकुमारांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले! 128 दिवसांपूर्वीच म्हणाले होते...

उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आली, अशी माहिती जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांना दिली. तसेच भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत, ही महत्त्वाची भूमिका आजच्या बैठकीमध्ये ठरली आहे.

याशिवाय महाविकास आघाडीचे एकत्रित संघटन व महाराष्ट्राला सक्षमपणे ठाम पर्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे. यावर एकमत आजच्या बैठकीत झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. कर्नाटकप्रमाणे (Karnataka) महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरुन अधिक मोठ्या संख्येने आणि ताकदीने महाविकास आघाडी पुढच्या काळात काम करेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

Leader of Mahavikas Aghadi
Karnataka Assembly Elections : सात टक्के मते आणि 70 जागांचा फरक! काँग्रेसने भाजप अन् जेडीएसचे बालेकिल्ले केले उद्ध्वस्त?

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला त्याचा तपशील आपण वाचला आहे. न्यायालयाने मर्यादा घालून विधानसभा अध्यक्षाना निर्णय घेण्याची जबाबदारी दिली आहे. लवकरात लवकर निर्णय द्यावा असे न्यायालयाने सांगितले आहे. त्यादृष्टीने विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या (Congress) ऐतिहासिक विजायनंतर महाराष्ट्रातही हालचाली वाढल्या आहेत. काही दिवासपूर्वीच आघाडीच्या नेत्यांमधील मतभेत समोर आले होते. एकमेकांवर टीका करताना नेते दिसत होते. मात्र, कर्नाटच्या निकालानंतर आघाडीने महाराष्ट्रातही आपली वज्रमूठ पुन्हा एकदा आवळली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com