फडणविसांचा सवाल; महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार आहात ?

सभागृहाचे कामकाज थांबवून अध्यक्षांच्या दालनात या विषयावर तातडीने बैठक घेण्याची मागणी फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirval) यांना केली.
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्यूरो

Published on
Updated on

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यावर केलेला हल्ला हा राजकीय विरोधकाला संपविण्याचा कट होता. व्हायरला झालल्या व्हिडीओवरून ते स्पष्ट होत असून राज्य सरकारने महाराष्ट्रचा बंगाल होऊ देऊ नये, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज विधानसभेत व्यक्त केली.

<div class="paragraphs"><p>देवेंद्र फडणवीस</p></div>
नीतेश राणेंच्या विषयात खासदार राऊत म्हणाले; यावर मी बोलणं बरं नाही

सभागृहाचे कामकाज थांबवून अध्यक्षांच्या दालनात या विषयावर तातडीने बैठक घेण्याची मागणी त्यांनी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना केली.वैचारिक विरोध आपण समजू शकतो. मात्र, विरोध करणाऱ्याला राजकीय विरोधकाला संपविण्याचा कट या व्हिडोओच्या माध्यमातून समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जे काही घडले त्यात स्टेशन डायरीत नमूद केलेल्या तपशीलावरून हा सारा प्रकार स्पष्ट असून व्हायरला व्हिडीओच्या माध्यमातून हा कट असल्याचे समोर आले आहे.

<div class="paragraphs"><p>देवेंद्र फडणवीस</p></div>
पडळकरांना संरक्षणाची ग्वाही देतानाच अजितदादांना आठवली ती वाक्ये!

राजकीय विरोध असू शकतो. राजकीय भूमिका घेऊन विरोध करणे आपण समजू शकतो. मात्र, राजकीय विरोधकाला आयुष्यातून उठविण्याचा प्रकार गंभीर आहे. अध्यक्षांनी या प्रकाराची गंभीर दखल घ्यायला हवी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

फडणवीस म्हणाले, ‘‘ महाराष्ट्राची राजकीय संस्कृती मोठी आहे. विचाराला विचाराने उत्तर देता येऊ शकते. मात्र, आटपाडीत ज्या प्रकारे पडळकर यांना पोलीस स्टेशनच्या समोर हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये पोलिसांची मोठी चूक आहे. मोठी दंगल घडविण्यासाठी जे आले होते. त्यांच्यावर कोणतीच कारवाई नाही. उलट पडळकर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला हे निंदनीय असून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही.’’

या प्रकरणात बघ्याची भूमिका घेत पोलीस स्टेशनसमोर दंगल घडविण्यासाठी तसेच आमदार पडळकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या जमावावर कोणतीही कारवाई न करणाऱ्या पोलीस आधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी फडणवीस यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com