IAS Transfer Order: राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे झाली बदली?

IAS Officers Transfer In Maharashtra: राज्य सरकारने राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
IAS Transfer Order
IAS Transfer OrderSarkarnama

Mumbai : राज्यातील 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्याचा आदेश राज्य सरकारकडून आज जारी करण्यात आला आहे. तर याआधी 2 जूनला राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

या बदल्यामध्ये आयएएस अधिकारी राजेश कुमार, अनूप कुमार, डॉ.राजगोपाल देवरा, असीम कुमार गुप्ता, राधिका रस्तोगी, संजय खंदारे, एकनाथ डवले, सौरभ विजय, आर.एस.जगताप, जितेंद्र दुडी यांचा समावेश आहे.

IAS Transfer Order
IAS Transfer Order: राज्यातील 'या' बड्या पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे झाली बदली?

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

- राजेश कुमार, ACS (RDD & PR), ग्रामीण विकास विभाग, यांची ACS (R&R) R&FD मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- अनूप कुमार, ACS (सहकार आणि विपणन), सहकार, विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग यांना ACS (Agri.), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे.

- डॉ.राजगोपाल देवरा, ACS आणि Devp.Commr. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची ACS (महसूल, नोंदणी आणि मुद्रांक), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- असीम कुमार गुप्ता, PS (R&R) R&FD यांना PS (1), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे.

- राधिका रस्तोगी यांची पीएस (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transfer Order
Prithviraj Chavan News : ब्रिजभूषणवर कारवाईला मोदी सरकार घाबरतंय : पृथ्वीराज चव्हाण

- संजय खंदारे यांची पीएस, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- एकनाथ डवले, पीएस (कृषी), कृषी आणि एडीएफ विभाग, मंत्रालय, मुंबई यांची PS (RDD&PR), ग्रामीण विकास विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- सौरभ विजय, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची पीएस आणि विकास आयुक्त, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

- आर.एस.जगताप, यांची यशदा, पुणे येथील उप महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- जितेंद्र दुडी, सीईओ , जिल्हा परिषद सांगली, यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Edited By-Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com