...तेव्हा फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर ‘करुणा’ दाखवली; मुख्यमंत्र्यांचा टोला!

पण, परत परत दया, करूणा दाखवता येणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना लगावला
 Dhananjay Munde-Devendra Fadnavis-Eknath shinde
Dhananjay Munde-Devendra Fadnavis-Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : काही लोक बाहेर फक्त एकच शब्द बोलतात. काही लोक म्हणतात ‘ताट वाटी; चलो गुहावाटी’. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) तर एवढ्या घोषणा देत होते की, जसे काय ते जुने शिवसैनिकच आहेत. त्यांच्यावर तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रेम करुणा सर्व काही दाखवले. पण, परत परत दया, करूणा दाखवता येणार नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना लगावला. (...then Fadnavis showed 'karuna' on Dhananjay Munde : Eknath shinde)

नगरविकास विभागाकडून मांडलेल्या ‘थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड’ या विधेयकावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते अजितदादा म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्रिपदाबाबत आधी सांगितले असते, माझ्या कानात सांगितले असते तर आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले असते. पण दादा ते ऐकत नव्हते; म्हणून तर असं (बंडखोरी) केलं ना.

 Dhananjay Munde-Devendra Fadnavis-Eknath shinde
हर्षवर्धन पाटलांशी संबंधित कारखान्याची शेतकऱ्याकडून एफआरपीसाठी तोडफोड

आपण घटनेप्रमाणे कामकाज करत आहोत. जो चुकीचा कारभार करेल, त्यावर कारवाई केली जाईल. आमदार भास्कर जाधव यांनी तर संपूर्ण नगरविकास विभागच वाचून दाखवला. राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी थेट सरपंच जनतेतून निवडा, असा निर्णय केला. आमचा स्वतःचा काहीच अजेंडा नाही. जे जनता म्हणेल ते आम्ही करणार आहोत, असेही त्यांनी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे पुन्हा एकदा समर्थन केले.

 Dhananjay Munde-Devendra Fadnavis-Eknath shinde
छगन भुजबळांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी हात जोडले!

‘देवेंद्र और मैं है साथ साथ, मेरा भी नाम है एकनाथ,’ असे म्हणत मी जर सक्षम नसतो, तर एवढा कार्यक्रम केला असता का? असे सूचक विधान करत सत्तांतराबाबतही त्यांनी भाष्य केले. मागील सरकार अल्पमतात आल्यानंतर आम्ही राज्यपालांना पत्र दिले होते. मग सरकार अल्पमतात आले तरी ४०० परिपत्रकं (जीआर) का काढली आहेत. मग ते निर्णय रद्द कसे काय करणार नाही, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com