BJP News : भाजपा राज्यात भाकरी फिरवणार; अनेक जिल्हाध्यक्षांना मिळणार नारळ...

Chandrashekhar Bawankule News : भाजपाने नुकतेच राज्याच्या कार्यकारिणीमध्ये बदल केले आहेत.
BJP
BJP Sarkarnama

BJP district president News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने आतापासून तयारी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा संघटनात्मक बदल करणार आहे. भाजपाने नुकतेच राज्याच्या कार्यकारिणीमध्ये बदल केले आहेत. यामध्ये अनेकांना नारळ देत नवीन पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. त्यानंतर आता राज्यभरातील जिल्हाध्यक्ष बदलले जाणार असल्याची चर्चा आहे.

जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपाचे राज्यपदाधिकारी विविध ठिकाणी जाऊन, कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्यासाठी विविध बैठकांचे आयोजन जिल्हास्तरावर केले जात आहे. त्यामुळे लवकरच भाजपा भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

BJP
Rahul Narvekar News : सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांचा लंडन दौरा; राजकीय वर्तुळात काय घडतेय?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने (BJP) आतापासून तयारी सुरु केली आहे. त्याच बरोबर राज्यात 'मिशन 45' ची तयारी सुरु आहे. या अंतर्गत केंद्रीय मंत्री विविध लोकसभा मतदारसंघांचे दौरे करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजपाने राज्य पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता जिल्हाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपाने राज्य पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन हे राज्यपदाधिकारी जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी बैठका घेत आहेत. त्या बैठकांमधील अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड पुढील १५ दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती आहे.

BJP
Dhoble-Bhalke photo Viral : पवारांनी अभिजित पाटलांच्या उमेदवारीचे संकेत देताच ढोबळे-भालकेंचा एकत्र फोटो व्हायरल!

यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. सध्या जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत. त्यातून नवीन अध्यक्षांची निवड होणार आहे. यामुळे भाजपा राज्यात भाकरी फिरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com