मोठी बातमी : ठाकरे-पवारांसोबत व्यासपीठावर येण्याचा 'योग' शिंदे-फडणवीसांनी टाळला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा 15 ऑक्टोबर रोजी 75 वा वाढदिवस आहे.
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama

Chhagan Bhujbal : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा 15 ऑक्टोबर रोजी 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने येत्या 13 ऑक्टोबर रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मात्र, सोहळ्यातील एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असलेल्या या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
२०१९ मध्ये घाई करून चूक झाली : शिवसेना प्रवेशावर दिलीप माने यांचे प्रथमच भाष्य!

सध्या राज्यातील ताणलेल्या राजकीय संबंध पाहता त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले नसल्याची चर्चा आहे. अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर येण्याचा 'योग' दोन्ही नेत्यांनी टाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या न जुळून आलेल्या 'योगा'ची आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

भुजबळांच्या या अमृतमहोत्सवी सोहळ्याला राज्यासह देशातील अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

याच कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनाही पाठवण्यात आले होते. मात्र, दोघांनीही हे निमंत्रण नाकारल्याची चर्चा आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ठाकरे आणि राष्ट्रवादीसोबत ताणलेल्या संबंधांमुळे दोघांनी हे निमंत्रण नाकारले असावे, असा तर्क काढण्यात येत आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे नेमकी विखे पाटलांची की थोरातांची?

छगन भुजबळ गौरव समितीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार कपिल पाटील, आमदार सचिन आहिर यांचा समावेश.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com