शिंदे शिवसेनेला आणखी एक धक्का देणार? उद्धव ठाकरेंची योजना बंद करण्याच्या हालचाली

Shivbhojan Thali : योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे सरकारला आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama

Shivbhojan Thali : मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सुरु केलेली शिवभोजन थाळी योजना बंद करण्याची शक्यता असल्याचे आहे. योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय शिंदे सरकारला आहे. ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जनतेला १० रूपयांमध्ये जेवण मिळते. कोरोना काळात थाळीची किंमत पाच रूपये करण्यात आली होती.

उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतली ही योजना होती. राज्यात १ लाख ८८ हजार ४६३ एवढ्या थाळ्यांची विक्रीची संख्या २ लाखांपर्यंत नेण्यासाठी ठाकरे सरकारने प्रस्ताव आणला होता. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिली.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Shivbhojan Thali : गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप करू नका..

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा शिंदे सरकारला संशय आहे. आता या योजनेचा आढावा घेतल्यानंतर ही योजना चालू करायची की बंद करायची याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दीली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गोरगरिब, कामगार, मजुर यांना पोटाला दोन घास मिळावे या चांगल्या हेतूने सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद करण्याच्या हालचाली शिंदे-फडणवीस सरकारकडून सुरू असल्याचे समजते. माझे या सरकारला सांगणे आहे, गोरगरिबांच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप करू नका. भ्रष्टाचार झाला असे तुम्हाला वाटत असेल तर जिथे झाला तिथे ही योजना बंद करा, याला कोणाची हरकत असणार नाही.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
वेदांता-फॉक्सकॉन तर गेला, सामंत-मुनगंटीवार गुजरातला जाऊन काय करणार ?

पण सरसकट योजना बंद केली तर मजूर, कामगार आणि गोरगरिबांची उपसमार होईल. औरंगाबादमध्ये अंबादास दानवे यांच्या पुढाकारातून सर्वात आधी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. अगदी केवळ दहा रुपयात पोटभर जेवण देण्याची ही योजना आजही सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com