Satyajeet Tambe News: "... म्हणून तर मी आमदार"; काँग्रेसवर तांबेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, "योग्य वेळ..."

Congress News : आमदार म्हणून सत्यजीत तांबेचा विधिमंडळातील पहिला दिवस
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्यात वाद सुरू झाला. पुढे ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसने कशा पद्धतीने तांबे कुटुंबास काँग्रेसबाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, याचा घटनाक्रम सांगितला. त्यामुळे काँग्रेस आणि तांबे यांच्यातील दरी वाढली. आज तांबे यांनी आमदार म्हणून विधिमंडळात पहिले पाऊल ठेवले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका जाहीर केली.

दरम्यान बंडखोरी केल्यानंतर तांबे यांना भाजपने (BJP) थेट पाठिंबा दिला होता. तसेच भाजप येण्यासाठी पायघड्याही अंथरल्या होत्या. तांबे यांनी मात्र भाजपच्या एकाही ऑफरला काहीही उत्तर दिले नाही. तसेच तांबे कुटुंबाच्या रक्तात काँग्रेस असल्याचेही सांगितले होते. आज त्यांना भविष्यातील वाटचालीबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याबाबत भूमिका स्पष्ट केली.

Satyajeet Tambe
Vijay Wadettiwar News: अर्थव्यवस्था खिळखिळी, त्यातही काळाबाजार खुलेआम सुरू, सरकारला धारेवर धरणार !

सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले, "हे पाहा… मी अपक्ष आमदार आहे आणि मी अपक्षच राहणार. परिस्थितीनुसार जसे-जसे प्रश्न येत राहतील, त्याप्रमाणे निर्णय घेतला घेईन." यानंतर त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवरील प्रश्नांवर उत्तर देणे टाळले.

ते म्हणाले, "काँग्रेसमध्ये येण्यासाठी सगळ्यांचेच निरोप आहेत. माझ्यासोबत सर्वांचेच आशीर्वाद आहेत. त्यांच्या आशीर्वादानेच मी इथपर्यंत पोहोचलोय." या सूचक विधानावर त्यांना काँग्रेसबाबत मनात काय सुरू आहे, असा थेटच प्रश्न करण्यात आला. त्यावेळी सत्यजीत तांबे म्हणाले, "माझ्या मनातील गोष्टी योग्यवेळी सांगेन." तांबेंच्या या विधानामुळे पुन्हा तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

Satyajeet Tambe
Thackeray vs Shinde : नार्वेकरांच्या आमदारकीचा रस्ता शिंदे गटातूनच जातो; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळात पहिल्यांदाच पाऊल ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते भावूक झाले होते. तांबे म्हणाले की, "यावेळी माझ्या भावना संमिश्र आहेत. शाळेतला पहिला दिवस असतो, त्या पद्धतीचीच आज भावना आहे. आमदार या भूमिकेतून पहिल्यांदाच येत आहे. मोठी जबाबदारी माझ्यावर आहे. माझ्यावर कोणता दबाव नाही, मनात कसली घालमेल नाही."

Satyajeet Tambe
Ambadas Danve News : `आप` चे दोन मुख्यमंत्री ठाकरेंना भेटले, त्याचा तर हा जळफळाट नाही ना ?

तांबे पुढे म्हणाले, "युवकांचा आवाज बनून विधानसभेत काम करायचं आहे. महाराष्ट्राच्या विकासात माझं काय योगदान देता येईल, याचा प्रयत्न मला करायचा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न मांडायचं काम मला करायचं आहे. माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा जो जुन्या पेंशन योजनेचा प्रश्न प्रकर्षाने मांडणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न प्रामुख्याने मांडणार आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com