Thackeray vs Shinde : नार्वेकरांच्या आमदारकीचा रस्ता शिंदे गटातूनच जातो; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ

Sanjay Shirsat : 'वर्षा'वर राज्यातून येणाऱ्या सर्वांना चहा-पाणी दिले जाते
Milind Narvekar, SanjayShirsat
Milind Narvekar, SanjayShirsatSarkarnama
Published on: 
Updated on: 

Milind Narvekar : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झालेली आहे. आज पहिल्या दिवशी ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे आमदार नसतानाही सभागृहात बसले. ही बाब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर नार्वेकरांनी प्रेक्षागृहाची गॅलरी समजून आत जाऊन बसल्याचे सांगितले. दरम्यान नार्वेकर हे आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे.

Milind Narvekar, SanjayShirsat
Manish Sisodiya Arrest : सिसोदीयांच्या अटकेनंतर 'आप' आक्रमक; दिल्ली - मुंबईत आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना (Eknath Shinde) आमदार संजय शिरसाट म्हणाले, "मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे आमच्या संपर्कात आहेत. त्यांना या विधिमंडळात येण्याची घाई झालेली दिसते. उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) नार्वेकरांना जवळ करीत नाहीत. अशा परिस्थितीत नार्वेकरांच्या आमदारकीचा रस्ता फक्त शिंदे गटातूनच जातो. न्यायालयीन लढाईनंतर आमच्याकडे किती इनकमिंग होईल आहे, हे लवकरच सगळ्यांना कळणार आहे."

Milind Narvekar, SanjayShirsat
Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात, पाहा फोटो!

शिरसाटांच्या या सूचक वक्तव्यामुळे आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मिलिंद नार्वेकरांनी (Milind Narvekar) सभागृहात जाण्यासाठी कोणाची परवानगी घेतली असेल. पण अनेक वर्षांपासून त्यांची आमदार व्हायची इच्छा असल्याचेही शिरसाट म्हणाले.

शिरसाट यांनी वर्षा बंगल्यावरील चहा-पाण्याच्या खर्चावरून विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले. तसेच उद्धव ठाकरे यांना टोलाही लगावला. ते म्हणाले, "खर्चाची आम्हाला जाणीव आहे. भेटायला येणारा कार्यकर्ता, शेतकरी, राज्यातील सामान्य नागरिक हा चहा-पाण्याशिवाय जात नाही. आधीचे मुख्यमंत्री तर आमदारांनाच भेटत नव्हते. त्यामुळे त्यांचा चहापाण्यावरील खर्चही कमी होता."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com