Pune News : नियम तोडण्यातही पुणेकरांची 'आघाडी' ; दंड वसुलीसाठी पोलिसांची कसरत

Pune News : कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
Pune traffic Rules latest News
Pune traffic Rules latest Newssarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणेकरांकडून (Pune) वाहतुकीच्या नियमांचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याची माहिती समोर आली आहे. वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. (Pune traffic Rules latest News)

पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने “तिसऱ्या डोळ्यांच्या”च्या माध्यमातून ही कारवाई केली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांवर १० महिन्यात तब्बल ७३ कोटी रुपयांहून अधिक दंड करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितली. कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Pune traffic Rules latest News
Shiv Sena : शिंदेंचा रामदास आठवले होईल.. 'वानखेडे' वरील ‘स्नेह’ इतर वेळी कुठे अदृश्य होतो ?

७३ कोटी २९ लाख ६८ हजार ९०० रुपये दंडापैकी २० कोटी ७ लाख ३८ हजार ७५० रुपये दंड पुणेकरांनी भरला असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. तर पुणेकरांकडून ५३ कोटी २२ लाख २५ हजार १५० रुपये दंड वसूल करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांसमोर आहे.

Pune traffic Rules latest News
Eknath Shinde : बच्चू कडू-राणांमध्ये पॅचअप ?; CM शिंदे समेट घडविण्यात यशस्वी ठरणार का ?

विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईत ३८ कोटी ५६ लाख दंड वसूल करण्यात आला आहे. तर नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्यांकडून १० कोटी ६५ लाख रुपये वसुल करण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियम न पाळणाऱ्या पुणेकरांमध्ये वाढ झाली आहे.

आकडेवारीवरुन पुणेकर वाहतुकीचे नियम तोडण्यातही कुणाच्या मागे नाही हे लक्षात येते. यात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहतुकीच्या इतर नियमांपेक्षा विनाहेल्मेट दुचाकीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com