आतातरी हजर व्हा! परबांकडून 'त्या' दहा हजार ST कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा

विलीनीकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने मागील 40 दिवसांपासून संप सुरू आहे.
Anil Parab
Anil Parab Sarkarnama

मुंबई : विलीनीकरणाच्या मुद्यावरून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना (ST Workers Strike) परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी पुन्हा निर्वाणीचा इशारा दिला आहे. पण परब यांनी निलंबित कऱण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. जे कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर हजर होतील, त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार असल्याची घोषणा परब यांनी केली आहे. जे हजर होणार नाहीत, त्यांच्यावर मंगळवारपासून कारवाई सुरू केली जाईल, असंही परब यांनी स्पष्ट केलं आहे.

परब यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, विलीनीकरणाचा स्वतंत्र निर्णय सरकार घेऊ शकत नाही. त्यामुळे संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. विलीनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या समितीसमोर आहे. बारा आठवड्यात अहवाल सादर केला जाईल. प्राथमिक अहवाल 20 डिसेंबर रोजी समिती सादर करणार आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्यासाठी महामंडळाने पाऊल उचललं. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत किंबहूना काही राज्यांपेक्षा जास्त पगारवाढ मिळाली.

Anil Parab
साम-दाम-दंड-भेद सर्व करून झालं, पण परबांच्या हाती काही लागेना!

कर्मचारी एकाच गोष्टीवर ठाम असल्याने इतर बाबींचा चर्चाच होऊ शकली नाही. पगारवाढ करूनही कर्मचारी कामावर येत नसल्याने सुमारे 10 हजार जणांचे निलंबन करण्यात आले आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झाली आहे. आता कर्मचाऱ्यांच्या लक्षात यायला लागले आहे की, विलीनीकरणाचा प्रश्न न्यायालयातच सुटेल. त्यामुळे अनेक कर्मचारी चिंतेत आहे. गटागटाने आमच्याशी संपर्क साधत आहेत, चर्चा करत आहेत, असे परब यांनी सांगितले.

निलंबन झाले म्हणून काही कर्मचारी आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्याचे लगेच राजकारण होते. आत्महत्येचे कारण काही असले तरी त्याला या संपाशी जोडले जात आहे. आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नाही. त्यामुळे आम्ही सतत आवाहन करत आहोत. राज्यभरातील विभागीय नियंत्रकांशी मी बोललो आहे. निलंबन असल्याने, काही जण अडवणूक करत असल्याने कामावर येता येत नाही, असं काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे असल्याचे परब यांनी नमूद केले.

Anil Parab
...तो व्हिडीओ पाहून वरूण गांधीही हळहळले अन् आपल्याच सरकारवर बरसले!

याचा विचार करून आम्ही आज महत्वाचा निर्णय घेतला आहे. जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील, त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल. ते त्याच डेपोमध्ये काम करतील. तिथे काम नसल्यास इतर आगारांमध्ये त्यांना पाठविले जाईल. तसे लेखी आदेश सर्व आगारांपर्यंत जातील, असं परब यांनी स्पष्ट केलं संधी दिली नाही, असं होऊ नये, म्हणून ही संधी दिली जात आहे. जे कामगार अद्याप निलंबित झाले नाहीत, त्यांनीही कामावर यावे, असं आवाहन परब यांनी केले आहे.

कामावर येण्यास काही जणांनी अडवल्यास संबंधित कामगारांनी पोलीस लगेच तक्रार करावी. जे कामगार अडवतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. सोमवारनंतर जे हजर होणार नाहीत, त्यांच्यावर प्रशासकीय प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जाईल, असा इशाराही परब यांनी दिला आहे. कायद्याच्या दृष्टीने अजून एक संधी देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे कामगारांनी ही संधी सोडू नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे परब यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com