Congress Vs Eknath Shinde : खड्ड्यांवरती डोलतोय मुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे काँग्रेसकडून ट्रोल

Chief Minister Eknath Shinde trolled by Congress over the pothole on the highway : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा डोलत जात असलेल्या व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत राज्यातील महायुती सरकारला काँग्रेसने ट्रोल केले आहे.
Congress Vs Eknath Shinde
Congress Vs Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबई-नाशिक महार्मागासह राज्यातील प्रमुख महार्मागावर पडलेल्या खड्ड्यांवरून काँग्रेसने महायुती सरकारला ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या वाहनाचा ताफा मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यातून डोलत प्रवास करतानाचा व्हिडिओ काँग्रेसने 'एक्स'वर शेअर केला. यावर 'खड्ड्यांवरती डोलतोय मुख्यमंत्र्यांचा ताफा', असा टोला लगावला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी सर्वसामान्य वाहनचालकांचे कंबरडे मोडले असताना या महामार्गावरचा प्रवास तापदायक असल्याचा अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आला. ठाण्यातून भिवंडी शहराच्या दिशेने असलेल्या एका उड्डाणपुलावरील खड्ड्यांच्या खाचखळग्यांतून हेलकावे खात मार्गक्रमण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ काँग्रेसने त्यांच्या समाज माध्यमावरील 'एक्स'वर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना, काम करण्याऐवजी केल्या विकासाचत्या गप्पा, खड्ड्यांवरती डोलतोय मुख्यमंत्र्यांचा ताफा, असे म्हणत आमच्या येथे हायवेला सुद्धा आॅफ रोडिंगचा अनुभव मिळेल. राज्याला खड्ड्यात घालणारे खड्डेमंत्री, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्रोल केले आहे.

Congress Vs Eknath Shinde
Video Sanjay Raut : 'मातोश्री'बाहेर आंदोलन करणाऱ्यांची 'कुंडली'च राऊतांनी काढली; म्हणाले, 'सुपारी गँग'चे नेते...

मुंबई-नाशिक महामार्ग प्रवासासाठी अतिमहत्त्वाचा आहे. परंतु सध्या हा महामार्ग खड्ड्यांत गेला आहे. वाहतूक कोंडीने सर्वसामान्य प्रवासी हैराण झाले आहेत. या मार्गावर काही किलोमीटरची होणारी वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. यावर टीकेची झोड उठताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाणी केली. महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा भिवंडीत वळला. भिवंडी तसेच आसपासचा परिसर खड्डेमय झाला असून, प्रवाशांसह वाहनाचालकांचे हाल होतांना प्रत्यक्ष अनुभवले.

Congress Vs Eknath Shinde
Rajan Vichare : हा घ्या पुरावा, दुबार दीड लाख मतदारांच्या नावासह राजन विचारेंची तक्रार

मुंबई-नाशिक (Nashik) महामार्गावर मोठ्या प्रमाण डेब्रिज टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणीत हे समोर आले आहे. त्यावर ते संतापले आहेत. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना याबाबत विचारणा केली. महार्मावर टाकलेले डेब्रिज हटवण्याचा आदेश देत, ते टाकणाऱ्यावर कारवाईचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

मिंधे सरकार तसेच गडकरी साहेबांचं अपयश समजावं

काँग्रेसने समाज माध्यमांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलेच ट्रोल केले आहे. मुंबई-महामार्गावरील खड्ड्यात डोलणाऱ्या त्यांच्या ताफ्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्थेवर देखील पोस्ट शेअर केली आहे. 'मिंधे सरकार तसेच गडकरी साहेबांचं अपयश समजावं', असे त्यात म्हटले आहे. तसेच डोंबिवली महापालिकेत खड्डे बुजवण्याची मशीन धुळखात पडल्याचेही काँग्रेसने समोर आणले आहे. डोंबिवली महापालिकेने 22 कोटी रुपये खर्चून कल्याण-डोंबिवलीमधील खड्डे बुजावल्याचा दावा करत आहेत. परंतु आजही सर्वसामान्य, वाहनधारक रस्त्यावरील खड्ड्यांतून प्रवास करत असल्याचे 'एक्स'वरील पोस्टमध्ये काँग्रेसने दावा केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com