Video Sanjay Raut : 'मातोश्री'बाहेर आंदोलन करणाऱ्यांची 'कुंडली'च राऊतांनी काढली; म्हणाले, 'सुपारी गँग'चे नेते...

Sanjay Raut Warning Shinde Group : "भाड्यांचे कार्यकर्ते आणून आमच्याविरोधात तमाशा केला जात आहे. हा तमाशा तुमच्याविरोधातही करू," असा इशारा राऊतांनी शिंदे गटाला दिला आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: वक्फ बोर्ड संशोधन बिलाच्या मुद्द्यावरून शनिवारी काही लोकांचा जमाव शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील 'मातोश्री'च्या निवासस्थानाबाहेर आला आणि तेथे घोषणाबाजी केली. पण, हे सगळे सुपारीबाज असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

त्यासह घोषणाबाजी आणि आंदोलन करणाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार नरेश मस्के आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांच्यासमवेत असलेले फोटो दाखवत संजय राऊत यांनी 'कुंडली'च बाहेर काढली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"दिल्लीतून सध्या सुपारीचे काम जोरात सुरू आहे. 'मातोश्री'च्या बाहेर वक्फ बिलाच्या संदर्भात आंदोलनासाठी आलेले लोक हे सुपारीबाज होते. वक्फ बोर्डाचे बिल हे संसदेत चर्चेसाठी आले नाही. ते सध्या 'जेपीसी'कडे गेले आहे. या बिलाला 'टीडीपी' आणि 'जेडीयू'नं विरोध केला आहे. पण, वक्फ बोर्डाची संपत्ती नेमकी कोणाला द्यायची आहे?" असा सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut
Mahayuti News : महावितरणच्या अधिकाऱ्यांची मुजोरी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना 'चटके' देणार

"'मातोश्री'बाहेर गोंधळ घालण्यासाठी आलेल्या 10 ते 12 जणांमध्ये अर्धे तर गुन्हेगार होते. आमच्याविरोधात घोषणाबाजी करणारे मुख्यमंत्री शिंदेंचे लोक होते. ही सगळी लोक वर्षा किंवा मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असतात. मुख्यमंत्र्यांसोबत फिरतात. अकबर सय्यद, सलमान शेख, अफराक सिद्धीकी, अक्रम शेख यांचे मुख्यमंत्री शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्यासोबत फोटो आहेत," असं राऊत यांनी सांगितलं.

Sanjay Raut
Eknath Shinde : "दाढीनेच तुमची गाडी खड्ड्यात घातली", मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना टोला

"सुपारी गँगचे कार्यकर्ते वक्फ बोर्डाच्या कायद्याबाबत आमची भूमिका जाणून घेण्यासाठी आले होते. या सुपारी गँगचे नेते वर्षा आणि मंत्रालयाच्या 6 मजल्यावर बसतात. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या कारवर हल्ला करणारे सुद्धा सुपारी गँगचे कार्यकर्ते आहेत. सुपारी गँगचे सरदार अहमद शहा अब्दाली दिल्लीत बसले आहेत. हे सर्व नाटक जनता पाहत आहे. भाड्यांचे कार्यकर्ते आणून आमच्याविरोधात तमाशा केला जात आहे. हा तमाशा तुमच्याविरोधातही करू," असा इशारा संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com