पुणे : सोलापूर भाजपचे (bjp) जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh)यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमुळे देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे राजीनामा दिला आहे. (Trupti Desai news update)
देशमुख यांचा बेडरूममधील पीडित महिलेबरोबरचा व्हिडिओ व संभाषणाची अठरा मिनिटांची क्लिप व्हायरल झाल्याने राज्यात चर्चेला ऊत आला. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई (Trupti Desai)यांनी देशमुखांवर हल्लाबोल करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Trupti Desai latest news)
व्हायरल क्लिपमध्ये पीडित महिलेने देशमुख यांनी आधी लग्न झालेले असतानाही आपल्याला फसवून लग्न केल्याची तक्रार केली आहे. “तू प्रथम बायकोपासून घटस्फोट का घेत नाही?’ म्हणत अर्वाच्य शिवीगाळही केल्याचे क्लिपमध्ये दिसत आहे. ही महिला पंधरा दिवसांहून अधिक काळ सांगोला शहरातील देशमुखांच्या घरी राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तृप्ती देसाई यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्या म्हणतात, "सोलापूरमध्ये श्रीकांत देशमुखांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा देशमुख मुंबईला जातो, मला हनी टॅपमध्ये अडकविले जात असल्याचे म्हणतो, अरे हनी टॅपमध्ये कोण कोण अडकतो, जे असे अनैतिक संबध ठेवतात, त्यांना हनी टॅपची भीती असते. सामान्य जनतेच्या नजरेच तुम्ही चांगले समजले जातात, तुम्ही जर असे कृत्य करीत असाल, तर जनता तुम्हाला चपलेनं मारतील,"
श्रीकांत शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. "राजकीय लोकांना किती महत्व द्यायचं, हे जनतेनं ठरविलं पाहिजे, एखादा चुकला तर त्यांच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, तरच आपल्या घरातील मुली त्यांच्या हातून वाचतील, " असे देसाई म्हणाल्या.
देशमुख यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीच्या प्रचाराच्या वेळी स्वत:वर गोळीबार झाल्याचा बनाव करून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा प्रकार केला होता. परंतु हा बनाव काही तासांतच पोलिसांनी उघडकीस आणला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.