Madam Chatur Vs Ms Fad-noise: ट्विटरवर नुसता गदारोळ; अमृता फडणवीसांनी थेट प्रियांका चतुर्वेदींची 'औकात' काढली...

Twitter War: अनिक्षा जयसिंघानी प्रकरणात प्रियांका चतुर्वेदी आणि अमृता फडणवीसांमध्येच शाब्दिक चकमकी झडत आहेत.
Madam Chatur vs Ms Fad-noise:
Madam Chatur vs Ms Fad-noise:Sarkarnama
Published on
Updated on

Amruta Fadnavis News: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाचेची ऑफर दिल्याप्रकरणी फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानीला पोलिसांनी तिला अटक केली. अनिक्षानं अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकारल्यानंतर अनिक्षाने ब्लॅकमेल करायला सुरुवात केली, असा आरोप मिसेस फसडणवीसांनी केलाय.आता याप्रकरणी ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी या वादात उडी घेतली आहे. त्यामुळे अनिक्षा राहिली बाजूला सध्या अमृता फडणवीस आणि प्रियांका चतुर्वेदी यांच्यातच ट्विटर वॉर पाहायला मिळत आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर अमृता फडणवीसांनी त्यांना उत्तर देण्याचं आव्हान केलं आहे. "मॅडम चतुर्वेदी, याआधीही तुम्ही मला एका खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. अॅक्सिस बँकेकडून मला काही चुकीचे फायदे मिळाल्याचे सांगितले होते. आताही तुम्ही माझ्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत. तसं पाहिलं तर एखाद्याने जर तुमचा विश्वास जिंकला आणि केस बंद करण्यासाठी तुम्हाला लाच दिली, तर तुम्ही तुमच्या मास्टरच्या माध्यमातून त्या व्यक्तीला नक्कीच मदत कराल. हीच तर तुमची औकात आहे.'' असे ट्विट करत अमृता फडणवीसांनी चतुर्वेदींची थेट औकातच काढली आहे.

Madam Chatur vs Ms Fad-noise:
Pune News : राहुल कुलांच्या मतदारसंघात झळकले राऊतांच्या आभाराचे फलक ; कर नाही त्याला डर कशाला..

तर दुसरीकडे अमृता फडणवीसांनी थेट 'औकात' शब्द वापरल्याने चतुर्वेदींनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. प्रियांका चतुर्वेदीने ट्विट केलं की, देवाच्या कृपेने मला माझी औकात दाखवण्यासाठी कोणत्याही डिझायनरकडून कपडे घ्यावे लागत नाही. ज्यामुळे नंतर मीच अडचणीत येईल. पण स्वतंत्र चौकशीच्या मागणीने तुम्ही इतके अस्वस्थ का झाले आहात, हे मला समजत नाहीये.पण ज्यादिवशी तिने तुम्हाला पैसे कमावण्याच्या टिप्स दिल्या तुम्ही तर त्याच दिवशी तक्रार करायला हवी होती,'' असे ट्विट करत त्यांनी मिसेस फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

एवढ्यावरच न थांबता, एका फरार गुन्हेगाराची मुलगी आधी उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीशी संपर्क साधते. मग, त्यांची मैत्री पाच वर्षे टिकते. ती उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला महागडे दागिने आणि कपडे देते. गाडीत सोबतही फिरते. ती डिझायनर मैत्रीण तुम्ही सट्टेबाजी करुन पैसे कमाऊ शकता हेही सांगते. इतकं होऊनही मैत्री कायम राहते, मग आताच ब्लॅकमेलिंगचे आरोप का होतोय, महाराष्ट्रात काय चाललंय, असा ही सवाल प्रियांका चतुर्वेदींनी फडणवीसांना विचारला आहे.

तसेच, या प्रकरणाची तटस्थपणे चौकशी करायला हवी. हेच जर विरोधी पक्षातील एखाद्या व्यक्तीसोबत घडले असते तर उपमुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करत भ्रष्टाचाराचे आरोप करायलाही सुरुवात केली असती. सोबतच ईडी, सीबीआय किंवा एसआयटीतर्फे चौकशीचे आदेशही दिले असते, असा टोलाही चतुर्वेदी यांनी लगावला आहे. यामुळे या प्रकरणात पुढे काय घडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com