कपिल पाटलांचा शिवसेनेला धक्का; नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे.
Kapil Patil
Kapil Patilsarkarnama

शहापूर : केंद्रीय राज्यमंत्री भाजप नेते कपिल पाटील (Kapil Patil) यांनी शहापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) खिंडार पाडले आहे. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेसाठी हा धक्का मानला जात आहे.

Kapil Patil
ओमिक्रॅानचा पुणे, पिंपरीत शिरकाव; सात जण आढळले पॅाझिटिव्ह

शिवसेनेचे विनोद कदम यांच्यासह वॉर्ड क्रमांक १ चे नगरसेवक सुनील बांगड आणि वॉर्ड क्रमांक २ च्या नगरसेविका रोशनी बुरसे यांच्यासह अनेक समर्थकांनी पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार किसन कथोरे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते.

या नगरसेवकांनी प्रवेश केला त्या वेळी बोलताना पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रेरणा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन यावरील वाढता विश्वास आणि पक्षाचा विकासात्मक दृष्टीकोन यामुळे अवघे शहापूर भाजपमय होत आहे, असा दावा त्यांनी केला.

Kapil Patil
साहित्य संमेलनामध्ये शाई फेक करणे निंदनीय : फडणवीस

दरम्यान, याआधी शिवसेनेचे नगरसेवक अजित आळशी, नगरसेवक आनंद अधिकारी, नगरसेवक हरेष पष्टे, वसंत अधिकारी, सतीश अधिकारी, नरेश अधिकारी यांच्यासह अनेक समर्थकांनी भाजपमधे प्रवेश केला होता. त्यानंतर आणखी दोन नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याने शिवसेनेला हा ऐननिवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com