सातारा : साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचं केंद्र असते. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसरीकडे कुठेही करायला हवी. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यवर गदा आणायची आणि शाई फेक करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज दिली.
साताऱ्यातील (Satara) कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी फडणवीस आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नाशिकच्या साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. साहित्य संम्मेलनाच्या शेवटच्या दिवशी या परिसंवादासाठी ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर (Girish Kuber) नाशिकमध्ये गेले आहेत. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने कुबेर यांच्यावर शाईफेक केली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेर यांच्या निषेधाच्या घोषणा देवून छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात केला. हा प्रकार घडला तेव्हा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले आणि इतर मंडळीही यावेळी त्याठिकाणी उपस्थित होते.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन रोटे पाटील यांनी याबाबातची जबाबदारी स्विकारली आहे. याबद्दल 'Abpमाझा' वृत्तवाहिनीशी बोलताना नितिन रोटे पाटील म्हणाले, 'संभाजी महाराजांवर गिरीश कुबेर यांनी पुस्तक लिहिले, त्यात संभाजी महाराजांनी आईची हत्या केली, महादजी शिंदे यांची बदनामी केली. त्याचा वचपा काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड त्यांच्यावर लक्षच ठेवून होते, आज पट्ट्यात येतील, उद्या पट्ट्यात येतील, शेवटी आज ते संभाजी ब्रिगेडच्या वाघांना भेटलेच! शेवटी वचपा काढलाच असेही ते म्हणाले.
या वर्षीच्या मे महिन्यामध्ये गिरिश कुबेर यांनी लिहिलेले ‘Renaissance State’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या पुस्तकातमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केला असल्याचा दावा करत अनेक वाद निर्माण झाले होते. त्यामुळे हे पुस्तक मागे घेवून त्यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी त्यासाठी निषेध आंदोलनही करण्यात आली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.