ते तुम्हाला दिसलं नाही हे दुर्दैव..! विरोधकांच्या टीकेला उदय सामंताचे प्रत्युत्तर

Eknath Shinde| Uday Samant| बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तिसऱ्या रांगेत उभे केल्यावरून रोहित पवारांचा केंद्रावर हल्ला
Uday Samant|
Uday Samant|

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. या बैठक संपल्यानंतर मिटिंगमधील फोटो व्हायरल झाले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या ग्रुप फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत उभे राहिले आहे. त्यावरुन महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.

राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावर ट्विट करत टीका केली होती. ''एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!'' असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते.

Uday Samant|
१५ आमदारांच्या विरोधामुळे शिंदे गटाची अडचण? जेष्ठ नेत्याच्या घरी खलबत

त्यावर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदेंचा कोणता अपमान केल्याच मला तरी वाटत नाही, असं उदय समांत यांनी म्हटलंय. फोटो बघितल्यावर एक लक्षात येतं की एकनाथ शिंदे फक्त फोटोसाठी तिथे उभे होते. याच्या आगोदर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे पहिल्या रांगेत होते. राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्याच्या एकनाथ शिंदे हे पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला होते. ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव आहे,” असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.

तसेच, “कुठेतरी राजकारणासाठी राजकारण करण्यात अर्थ नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने महाराष्ट्राचा मान-सन्मान दिल्लीमध्ये नक्कीच वाढलेला आहे. त्याची प्रचिती ओबीसी आरक्षणापासून अनेक गोष्टींमधून दिसून आली आहे. असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com