बोट चालवत खासदार उदयनराजे मंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला...

काय कुठं चाललं आणि स्टेअरिंग कुठं चाललं मला काही कळत नाही, अशी टीप्पणीही त्यांनी हसत हसत केली. तसेच सध्या हातात असलेलं बोटीचं स्टेअरिंगचं चांगलं असल्याचेही उदयनराजेंनी नमुद केले.
MP Udayanraje went to meet Minister Eknath Shinde while driving the boat ...
MP Udayanraje went to meet Minister Eknath Shinde while driving the boat ...
Published on
Updated on

सातारा : भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आज चक्क बोट चालवत नगरविकसामंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. कोयना धरणातील जलायशयामधून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतलं. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील स्टेअरिंग या बोटीच्या स्टेअरिंगप्रमाणे तुमच्या हातात असेल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उदयनराजेंनी आता ज्यांच्या हातात स्टेअरिंग आहे,  त्यांनाच तुम्ही हा प्रश्न विचारा असे उत्तर दिेले. Udayanraje went to meet Minister Eknath Shinde while driving the boat ...

भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे आज नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तापोळा विभागातील दरे गावी भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना बोट चालविण्याचा मोह आवरला नाही. काही वेळ त्यांनी बोटीचे स्टेअरींग हाती घेतले. यावेळी उपस्थितांना मात्र, हा सुखद धक्काच होता.  

यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले, निसर्ग आपण सर्वांनी जपला पाहिजे, ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण निर्सगासमोर फार छोटे आहोत. निर्सगामुळेच आज आपल्या सर्वांचं अस्तित्व आहे. आज आपण ग्लोबल वॉर्मिगसारख्या गोष्टींबद्दल बोलतो. वृक्षतोड झाल्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या निर्माण झाल्यात. वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे तसेच वृक्ष जपले पाहिजेत. पाणी आडवलं पाहिजे. भूजलपातळी वाढली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट कले. 

आगामी लोकसभा असतील किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील स्टेअरिंग या बोटीच्या स्टेअरिंगप्रमाणे तुमच्या हातात असेल का, असा प्रश्न विचारला, असता यावर उदयनराजे म्हणाले, आता ज्यांच्या हातात स्टेअरिंग आहे. त्यांनाच तुम्ही हा प्रश्न विचारा, असे त्यांनी स्पष्ट करत काय कुठं चाललं आणि स्टेअरिंग कुठं चाललं मला काही कळत नाही, अशी टीप्पणीही त्यांनी हसत हसत केली. तसेच सध्या हातात असलेलं बोटीचं स्टेअरिंगचं चांगलं असल्याचेही उदयनराजेंनी नमुद केले. 

आज सकाळी जावळी तालुक्यातील कोळघर (ता. सोळशी) गावातून खासदार उदयनराजे भोसले तराफ्यामधून एकनाथ शिंदे यांच्या दरी गावी पोहचले. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. या तिघांमधे बंद खोलीमध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिवंतग बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रवाना झाले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com