Uddhav Thackeray Reply to Devendra Fadnavis Criticism : महाविकास आघाडीच्या वतीने महापुरुषांच्या अवमानप्रकरणी, सीमावाद यांसारख्या विविध मुदद्यांवर मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा फेल झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चाला 'नॅनो' मोर्चा म्हणून देखील हिणवलं होतं. आता शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे) ने महाआघाडीचा मोर्चा यशस्वी झाल्याचा दावा करतानाच देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis)दावाही खोडून काढला आहे. (Uddhav Thackeray Reply to Devendra Fadnavis Criticism on MVA Morcha)
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांच्या टीकेचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.
मुंबईतला शनिवारचा महामोर्चा टोकदार आणि धारदार होता. हा मोर्चा निघू नये म्हणून 'गुंगाराम' सरकारने नाना खटपटी, लटपटी केल्या. या बेकायदा सरकारने नियम, कायद्यांचे, अटी - शर्तींचे कागदी भेंडोळे नाचवले. तरीही महामोर्चा निघालाच. या पुढेही आंदोलनाच्या तोफा धडधडतच राहतील. नापास, बेकायदा सरकार काय म्हणतंय याकडे लक्ष द्यायची गरज नाही. मोर्चा यशस्वी झाला, याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे फडणवीस यांनी तळमळून सांगितले की, मोर्चा फेल झाला! याचाच अर्थ मोर्चा भव्य होता आणि यशस्वी झाला असून हे सरकार टरकले आहे अशा शब्दांत सामनातून उध्दव ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेसह महाविकास विकास आघाडीचा धडक मोर्चा शनिवारी मुंबईत निघाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो महाराष्ट्रप्रेमी जय महाराष्ट्रच्या घोषणा देत मुंबईच्या रस्त्यावर उतरले. मात्र, देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मोर्चा फेल गेला. अपयशी ठरला. हा महामोर्चा नव्हे; हा तर नॅनो मोर्चा होता, मुळात ज्यांना या मोर्चाचे भव्य स्वरूप दिसले नाही, त्यांच्या डोळ्य़ांत मराठी द्वेषाचा वडस वाढला आहे, असंच म्हणायला हवं. शनिवारचा मुंबईतील भव्य मोर्चा म्हणजे निवडणुका जिंकणारी ईव्हीएमची कलाकारी नव्हती अशी बोचरी टीकाही ठाकरेंनी सामनातून केली आहे.
यावेळी 'छत्रपती शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असताना राज्याचे सरकार मूकबधिर होऊन बसले आहे. कारण दिल्लीने त्यांना गुंगीचे इंजेक्शन टोचून पाठवले आहे. या गुंगीचा असर ओसरला की, पुढचे इंजेक्शन देऊन सरकारला झोपवून ठेवले जाते. अशा गुंगीने बधिर झालेल्यांच्या पेकाटात लाथ घालून जागे करण्यासाठी मुंबईतील मोर्चा एका त्वेषाने निघाला होता. तेव्हा हा मोर्चा 'फेल' होता असे सांगणे म्हणजे गुंगीचा असर न उतरल्याचे लक्षण मानावे लागेल व अशा लोकांची उरलेली गुंगी नागपूरच्या अधिवेशनात उतरवावी लागेल असा इशाराही ठाकरे गटाकडून सरकारला दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.