Badlapur School Crime Case : पोलिस महासंचालकांना 'लाडकी बहीण' होण्याची संधी; उद्धव ठाकरे, असं का म्हणाले...

Uddhav Thackeray appeal to the Director General of Police : मुंबईतील बदलापूर अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने उद्या राज्यात बंदची हाक दिली असून, उद्धव ठाकरेंनी राज्यातील पोलिस महासंचालक यांना उद्धव ठाकरेंनी आवाहन केले आहे.
Uddhav Thackeray And Rashmi Shukla
Uddhav Thackeray And Rashmi Shukla Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बदलापूर अत्याचारप्रकरणाचा निषेधासाठी महाविकास आघाडीने उद्या शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीचे नेते तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा बंद विकृतीविरुद्ध संस्कृती असा असून, राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्याची 'लाडकी बहीण' होण्याची संधी आहे. त्यासाठी उद्या बंदवेळी राज्यातील संपूर्ण पोलिसांना एक आवाहन करण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी रश्मी शुक्ला यांना दिला.

उद्धव ठाकरे यांनी उद्या महाराष्ट्र बंदची रूपरेषा सांगितली. अत्यावश्यक सेवा वगळता दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या बंदमुळे कोठेही हिंसा होता काम नये, अशी इच्छा व्यक्त केली. हा बंद विकृतीविरुद्ध संस्कृती असा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मोठे आवाहन केले. "महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिस (Police) महासंचालकपदी महिला विराजमान झाली आहे. त्यांना आता संधी आहे, त्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण होऊ शकतात. महाराष्ट्राची लाकडी बहीण त्यांना व्हायचे, तर उद्या त्यांनी संपूर्ण राज्यातील पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की, अगोदरच सूचित केले पाहिजे की, बंदच्या आड येऊ नका", असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Uddhav Thackeray And Rashmi Shukla
Badlapur News : 'आंदोलक बदलापूरचेच!' रिमांड कॉपीचा फोटो दाखवत राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, "मंत्रिमंडळात काय लायकीची…"

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी चांगलेच सुनावले. "मुख्यमंत्री उद्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमासाठी जाऊ शकतात, कारण त्यांना बहिणी या मतदानासाठी पाहिजे आहे. बहिणीची किंमत मतदानासाठी आहे. आमच्याकडे बहिणीची किंमत नातं आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत. तुम्हाला जर वाटत असेल, तर माझ्या बहिणींची मतं विकत घेऊ शकतात, पण माझ्या बहिणी एवढ्या विकाऊ नाहीत, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे", अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले.

Uddhav Thackeray And Rashmi Shukla
Badlapur Case : ज्या पक्षाची शाळा, त्याच पक्षाच्या उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती, प्रकरण दाबलं गेलं तर? काँग्रेसचा सवाल

बदलापूर अत्याचारघटनेवर उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासून आक्रमक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर ते वारंवार तोंडसुख घेत, महाराष्ट्र बंद कशासाठी हे सांगत आहे. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विकृतीविरुद्ध संस्कृती, असा हा बंद आहे. त्यामुळे यांचे गांभीर्य माझा संपूर्ण महाराष्ट्र ओळखेल आणि दुपारी दोन वाजेपर्यंत बंद यशस्वी करतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्रात होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराची यादीच पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर चांगलीच बोचरी टीका केली. या दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्याला क्षमता नसलेला मुख्यमंत्री लाभला आहे, असेही देखील ठाकरे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com