Maharashtra Political News : सत्तासंघर्षात शिवसेना आणि धनुष्यबाणही निसटल्यानंतर 'मशाल' पेटवून निवडणुका लढविलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा दिसून आला. विशेष म्हणजे, नको तेवढी 'दुश्मनी' केलेल्या भाजपला हरविल्याचा अभिमान असल्याचे सांगून ठाकरेंनी फडणवीसांच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळले. 'मस्तवाल सत्ताधीश' अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपचा पाणउतारा केला. कोकणातील नारायणे विजय ही गडबड असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
इंडियाला एकत्र आणून सत्तेतसाठी प्रयत्न केलेच पाहिजेत, ते करू. उद्या दिल्लीला जाऊन त्यावर चर्चा करू, असे स्पष्ट करून दिल्लीत भाजपविरोधात दंड थोपटणार असल्याचे ठाकरेंनी सूचित संगितले. ममता बॅनर्जी इंडियासोबतच आहेत. तर एनडीएतील टीडीपीचे चंद्रबाबू नायडू नाराज असल्याचेही सूचक विधान ठाकरेंनी केला. यातून आता जुना मित्र भाजपला पूर्णपणे सोडल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थात ठाकरेंचीही ही भाषा म्हणजे, भूल चुका हूँ उन लोगों को जिनको गलती से चुन लिया था, असेच सांगणारी आहे. आता उद्या दिल्लीला गेल्यानंतर इंडिया आघाडीत सत्ता स्थापनेसाठी ठाकरे काय प्रयत्न करणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीत देशभरातली ५४३ पैकी भाजपप्रणित एनडीएला २९४ तर इंडिया आघाडीला २३३ जागा जिंकल्या आहेत. तर राज्यात महाविकास आघाडीपुढे महायुती निष्प्रभ ठरली. महाविकास आघाडीने २९ जागा खेचल्या तर महायुतीला फक्त १८ जागांवर समाधान मानावे लागले. लोकसभेत देशासह राज्यात मिळालेल्या या यशानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला.
ठाकरे म्हणाले, या निकालातून मस्तवाल सरकारला आपण घरी बसवू शकतो, असा विश्वास राज्यासह देशाने संपूर्ण जगाला दिला आहे. देशभर सुरू असलेल्या सुडाचे, फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना लोकांनी चांगलाच धडा शिकवला आहे. राज्यात ज्या ठिकाणी मोदींनी सभा घेतल्या त्या जागांवर महायुतीचा पराभव झाला आहे. त्यामुळेच त्यांनी वारंवार राज्यात यावे, असे वाटत होते, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.