Uddhav Thackeray News : ठाकरे गटाची गळती थांबेना; बीएमसी निवडणुकीआधी 'जोर का झटका'!

Uddhav Thackeray In Trouble : गटाला रामराम केल्यामुळे हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो.
Uddhav Thackearay
Uddhav ThackearaySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे गटाच्या शिलेदारांना आपल्याकडे वळविण्याच्या धक्कातंत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मालिका अजूनही सुरूच आहे. मुंबई महापालिकेत ठाकरेंचे हात बळकट केलेल्या माजी नगरसेवकांना साऱ्याच प्रकारची ताकद देण्याचा शब्द देत, शिंदे यांनी आतापर्यंत ४०-४५ माजी नगरसेवक फोडले. त्यात आता अनेक टर्म नगरसेवक राहिलेले ठाकरे गटाचे नेते मंगेश सातमकर यांचीही भर पडली आहे. पुढच्या काही दिवसांत महापालिका निवडणुकांच्या तयारीला वेग येऊ शकतो; त्याआधीच शिंदे मुंबईत शिवसेनेचा विस्तार करीत आहेत.

Uddhav Thackearay
शिवसेनेचे मंगेश सातमकर यांचे नगरसेवकपद धोक्‍यात 

ठाकरे गटाचे नेते असलेले माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांचा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश हपार पडणार आहे. मुंबईतील एक महत्त्वपूर्ण मोहरा ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो.

Uddhav Thackearay
Eknath Shinde On Thackeray : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेंचे जिव्हारी लागणारे वार; म्हणाले...

कोण आहेत सातमकर?

मंगेश सातमकर मागील अनेक टर्म नगरसेवरक राहिलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे ते अध्यक्षही राहिलेले आहेत. स्थायी समिती आणि इतरही अनेक समित्यांवर त्यांनी काम केलेले आहे. २०१४ मध्ये सातमकर यांनी सायन कोळीवाडा मधून विधानसभेची निवडणूक लढवली होती.

Uddhav Thackearay
Eknath Shinde On Thackeray : वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेंचे जिव्हारी लागणारे वार; म्हणाले...

१९९४ मध्ये ते पहिल्यांदा मुंबई मनपात नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर २००२, २००७, २०१७ मध्ये ते महानगरपालिकेच्या निवडणूक त्यांनी जिकली होती. सातमकरांनी अनेक वर्षे बीएमसी शिक्षण समितीवर अध्यक्षही राहिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com