Ajit Pawar News : उद्धव ठाकरे आले, त्यावेळी कोणाला डोळा मारला? अजित पवारांनी दिले हे उत्तर....

त्या ठिकाणी कॅमेरे नव्हते; म्हणून बरे झाले. बरं त्यातून अर्थ काहीही निघतो, असेही अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मुंबई : मागील आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे (Uddhav Thackeray) हे विधीमंडळात आले होते, त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार हे माध्यमांशी बोलत होते. मात्र, ठाकरे आल्यामुळे ते बाजूला झाले, बाजूला होत असताना त्यांनी डोळा मारला होता. त्याची चर्चा राज्यभरात रंगली होती. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (Uddhav Thackeray came, Ajit Pawar's explanation about the incident happened at that time)

अजित पवार म्हणाले की, अलिकडे तर व्हिडिओ कॉल करून बोलण्याची पद्धत रुढ होत आहे. त्यामुळे काय करायचं, हे कळतंच नाही. विशेषतः दोन्ही बाजूच्या आमदारांनी व्हिडिओ कॉल आला तर पहिल्यांदा तुमचा चेहरा दाखवू नका. तो कॉल कुणाचा आहे, ते अगोदर बघा. तिकडंच कुणाला तरी दाखवा. आपण बोलायला लागलो की ते तिकडून फोटो (स्क्रीनशॉट) काढतात आणि सांगतात की हे बघा आम्ही यांच्याशी बोलत होतो. अशा प्रकरणात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा आमदारही बळी पडू नये, अशी माझी भावना आहे.

Ajit Pawar
Shiv Sena News : शिवसेनेला लोकसभेच्या २२, तर विधानसभेच्या १२६ जागा सोडाव्याच लागतील : गजानन कीर्तीकरांनी भाजपला सुनावले

आजकाल आपल्यासारख्या राजकारण्यांना एखादी चूक करायलाही भाग नाही. चुकून एखादा डोळा आपण बंद केला तर डोळा मारला...ऽ डोळा मारला...ऽऽ डोळा मारला....ऽऽऽ अशी चर्चा होत राहते. मी आणि उपमुख्यमंत्री विधानमंडळात उभे होतो. त्यावेळी त्यांनी नाना पटोले यांना डोळा मारला. आता काय म्हणायचे.... (त्यावेळी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले) त्या ठिकाणी कॅमेरे नव्हते; म्हणून बरे झाले. बरं त्यातून अर्थ काहीही निघतो, असेही अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
BJP News : पुढचा मुख्यमंत्री मीच होणार : भाजपत रंगणार शह-कटशहाचे राजकारण

काय झालं. उद्वव ठाकरे आले आणि ते आल्यावर मी डोळा मारला म्हणजे मी त्यांच्याबद्दलच डोळा मारलाय काय. हे काय बरोबर नाही. राज ठाकरे यांनीही माझ्या डोळा मारण्याची नोंद घेतली. काय म्हणजे, कशाचा कशाला मेळ नाही. मी खरं तर त्यावेळी एका वृत्तवाहिनीचा प्रतिनिधीला मी तो डोळा मारला होता, असे स्पष्टीकरणही अजित पवार यांनी त्या प्रकरणावर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com