Uddhav Thackeray यांच्या डोळ्यात डोळे घालून एकनाथ शिंदे बघणार?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अद्याप विधान परिषद आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

Uddhav Thackeray : मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जून महिन्यात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याच्या वेळीच त्यांनी आपल्या आमदारकीचा म्हणजे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आता दोन महिने झाली तरी त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा सभापतींकडे पाठविलेला नाही.

आता नवीन रणनीतीनुसार ठाकरे हे आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार, जयंत पाटील हे ठाकरे यांना नुकतेच भेटले होते. त्या वेळी ठाकरे यांना राजीनामा न देण्याचा सल्ला देण्यात आला. हा सल्ला मानण्याचे ठाकरे यांनी ठरविले आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
बावनकुळे, खोपडे यांना मी मंत्रालयातील किडे म्हणायचो : फडणवीस

त्यामुळे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत आगामी पावसाळी अधिवेशनात उपस्थिती लावणार का, याची उत्सुकता असणार आहे. अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्याचवेळी त्यांनी आपण विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, अद्याप त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे समोर आले आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
भुमरेंकडे फक्त झेंडावंदनाची जबाबदारी, पालकमंत्री अजून ठरायचायं ; सत्तारांचे सूचक विधान

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन चूक केली, असे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यामुळे आता आमदारकीचाही राजीनामा उद्धव ठाकरे यांनी देऊ नये असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितल्याचे समजते. शिवसेनेतील संघर्ष हा सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. त्यावर २३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. राज्य विधानसभेचे अधिवेशन येत्या 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाला ठाकरे उपस्थित राहणार का, याची उत्सुकता राहील. तसेच ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे एकाच वेळी सभागृहात असतील तर शिंदे हे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणार का, याचेही औत्सुक्य असेल. कारण गेल्या अधिवेशनात एकाही बंडखोर आमदाराने माझ्याशी डोळे भिडविण्याची हिम्मत झाली नव्हती, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी तेव्हा व्यक्त केली होती. त्यामुळे ठाकरेंची उपस्थिती आणि शिंदेंची प्रतिक्रिया हे पाहणे याकडे अनेकांचे लक्ष असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com